Saam Tv
सध्या लग्नाची धामधुम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतयं.
लग्नाच्या खरेदीत सगळ्यात आधी सोनं खरेदी केलं जातं. मात्र सोन्याचे दर आता गगनाला भिडले आहेत.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचा दर आता १ लाखांच्यावर गेला आहे.
गेल्या २४ तासात सोन्याचा दर १ लाख २ हजार ५०० रुपयांवर पोहोचला आहे.
सोन्याचा हा वाढता आकडा पाहून सर्वसामान्यांना चांगल्याच घाम फुटलेला आहे.
एप्रिलमध्ये सोन्याचा भाव ९ हजारांनी वाढलेला आहे. तर लाखाचा टप्पा पार केला आहे.
एक किलो चांदीच्या दराप्रमाणे सोन्याचे दर जळगावच्या सराफ बाजारात पाहायला मिळाले आहेत.
सोन्याच्या वाढत्या दरामुळे आता ग्राहकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवलेली पाहायला मिळत आहे.