Surabhi Jayashree Jagdish
हार्ट फेल्युअर ही अशी एक अवस्था असते ज्यात हृदय शरीराच्या गरजेनुसार पुरेसं रक्त पंप करू शकत नाही.
थोडं चालल्यानंतर किंवा पायऱ्या चढल्यानंतर श्वास लागणं. झोपल्यावर श्वास घेण्यात त्रास होणे, ज्यामुळे रात्री वारंवार झोपमोड होऊ शकते.
हृदय कमकुवत झाल्यामुळे शरीराला आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे सतत थकवा जाणवतो.
हृदय नीट काम न केल्याने शरीरात द्रव साचतो, ज्यामुळे पायांमध्ये, घोट्यांमध्ये आणि पोटात सूज येतं.
हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागल्यामुळे त्याची धडधड जलद किंवा अनियमित होऊ शकते.
पचनसंस्थेकडे रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे भूक मंदावणं किंवा मळमळ होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
शरीरात पाणी साचल्यामुळे अचानक वजन वाढू शकते.
पौष्टिक आहार घ्या, नियमित व्यायाम करा, वजन नियंत्रणात ठेवा, धूम्रपान आणि मद्यपान टाळा आणि ताण कमी घ्या.