World Health Day 2023
World Health Day 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

World Health Day 2023 : तुम्ही दररोज आरोग्याची काळजी कशी घेता ? या 5 गोष्टी अवश्य जाणून घ्या

कोमल दामुद्रे

Message of World Health Day : आज जगभरात जागतिक आरोग्य दिन साजरा केला जात आहे. जागतिक स्तरावर आरोग्य समस्या आणि त्यावर विचार करण्यासाठी 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संमेलन झाले.

जागतिक आरोग्य दिन साजरा (Celebrate) करण्यामागचा उद्देश केवळ चांगले खाणे-पिणे नसून आपल्या आरोग्याची पुरेशी काळजी घेणे देखील गरजेचे आहे. तसेच समजात आरोग्याविषयी जागरुकता पसरवण्यास मदत केली पाहिजे.

कोरोनानंतर जगभरातील लोकांचे आरोग्याबाबतचे (Health) गांभीर्य वाढले आहे, परंतु तरीही अनेक लोक अशा चुका करतात ज्यामुळे ते आजारी (Disease) किंवा अस्वस्थ होतात.

दररोज तीन लिटर पाणी यासारख्या अनेक सवयी आपल्याला निरोगी बनवतात. पण या सवयी आपण सगळेच आत्मसात करतो का? आज आम्ही तुम्हाला आरोग्याशी संबंधित 5 प्रश्न सांगणार आहोत जे प्रत्येकाने स्वतःला पुन्हा पुन्हा विचारले पाहिजेत.

1. मी दररोज एक लिटर पाणी पितो का?

पाण्याशिवाय जीवन जगणे कठीणच. परंतु बहुतेक लोकांना कमी पाणी (Water) पिण्याची सवय आहे. प्रत्येकाला माहित आहे की, आपण किमान, दिवसभरात किमान 8 ग्लास पाणी प्यायला हवे. परंतु आळस किंवा इतर कारणांमुळे लोक या चांगल्या सवयीपासून दूर राहतात.

2. ऑफिसच्या ताणामुळे आरोग्यावर परिणाम होतो का?

नोकरी करणाऱ्यांपैकी बहुतांश लोकांना तणावाचा सामना करावा लागतो. पण या तणावाचा त्यांच्या मानसिकच नव्हे तर शारीरिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो हे अनेकांना माहीत नाही.

3. दररोज किती मिनिटांचा व्यायाम करावा?

चांगल्या आहारासोबतच व्यायामाची दिनचर्या पाळणेही महत्त्वाचे आहे. किती मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कायम आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की आपण दिवसातून किमान 30 मिनिटे काही शारीरिक हालचाली केल्या पाहिजेत.

4. मी निरोगी आहार घेत आहे का?

बाहेरचे खाल्ल्याने चवीला छान लागते पण त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. मी खूप जंक फूड खात आहे का हे तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे. निरोगी आहारात मी काय खावे हे देखील जाणून घ्या

5. शरीराची तपासणी करणे किती महत्त्वाचे आहे?

ही पद्धत दर सहा महिन्यांनी अवलंबली पाहिजे असे तज्ञांचे म्हणणे असताना भारतातील लोक शरीर तपासणी करणे टाळतात. शरीराची तपासणी किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला माहीत असले पाहिजे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Accident: रॉग साईंडनं आलेल्या ट्रकनं कारला चिरडलं; कारचा चुराडा

Beed News : गाढ झोपेतच मृत्यूने गाढले; अंगावरून डंपर गेल्याने २ तरुणांचा मृत्यू

Andaman Monsoon News | अंदमानात मान्सूनची हजेरी,नागरिकांना दिलासा!

IPL 2024 Playoffs: RCB चा संघ प्लेऑफमध्ये कोणत्या संघाविरुद्ध खेळणार? समजून घ्या समीकरण

Health Tips: तुम्हाला पण आंबट ढेकर येत आहेत का? ट्राय करा 'हे' घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT