Summer Health Care : उन्हाळ्यात सतत तहान लागते? वजनही वाढतेय? डाएटमध्ये सामील करा हे 5 ड्रिंक्स

Weight Loss Tips : बदलती जीवनशैली आणि चुकीचे खाण्यामुळे वजन वाढण्याची समस्या सामान्य होत चालली आहे.
Summer Health Care
Summer Health CareSaam Tv

Weight Loss In Summer : बदलती जीवनशैली आणि चुकीचे खाण्यामुळे वजन वाढण्याची समस्या सामान्य होत चालली आहे. तरी वाढत्या वजनामुळे अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. तुम्हालाही लठ्ठपणा कमी करायचा असेल तर उन्हाळा तुमच्यासाठी सर्वात खास असतो. 

या ऋतूमध्ये तुम्ही शरीरात जमा झालेली चरबी सहज कमी करू शकता. तुम्हाला त्या पेयांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा समावेश तुम्ही वजन कमी (Weight Loss) करण्याच्या प्रवासात करू शकता. जे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यास देखील मदत करेल.

Summer Health Care
Weight Loss Tips : ग्रीन कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

संत्र्याचा रस -

संत्र्याचे रस हे सर्वोत्तम डिटॉक्स पाण्यापैकी एक आहे जे तुम्ही उन्हाळ्यात घेऊ शकता. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे चयापचय वाढवते. यासाठी पाण्याच्या (Water) बाटलीत संत्र्याचे तुकडे मिसळा, त्यानंतर हे पेय घ्या.

मेथीचे पाणी -

जर तुम्हाला उन्हाळ्यात वजन कमी करायचे असेल तर तुम्ही रोज सकाळी मेथीचे पाणी पिऊ शकता. हे वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. यासाठी मेथीचे दाणे रात्री पाण्यात भिजत ठेवा, सकाळी बिया काढून रिकाम्या पोटी पाणी प्या. वजन कमी करण्याच्या प्रवासात मेथीचे पाणी एक उत्तम पर्याय ठरू शकते.

Summer Health Care
Weight Loss Tips : झपाट्याने वजन कमी करायचे असेल तर, नाश्तासोबत सामील करा या स्मुदी

ताक -

जेवणानंतर ताक पिणे सर्वांनाच आवडते. हे एक आरोग्यदायी पेय आहे, जे पचनशक्तीसाठी खूप फायदेशीर आहे. त्यात निरोगी बॅक्टेरिया असतात, ते आतड्यांसाठी फायदेशीर असतात. उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी तुम्ही ताकही घेऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास मीठ आणि मसाले घालून ताकही पिऊ शकता.

लिंबू आणि मिंट डिटॉक्स पाणी -

सकाळची सुरुवात करण्यासाठी लिंबू आणि पुदिना डिटॉक्स वॉटर हा एक उत्तम पर्याय आहे. लिंबू आणि पुदिना आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही लिंबू आणि पुदिन्याचे पेय नियमितपणे पिऊ शकता. यामुळे उन्हाळ्यातही तुमचे शरीर हायड्रेट राहते.

सफरचंद आणि दालचिनी पाणी -

सफरचंदमध्ये भरपूर फायबर असते आणि दालचिनीमध्ये कॅल्शियम, लोहासारखे पोषक घटक आढळतात. या दोन्हीचे मिश्रण करून तुम्ही हेल्दी ड्रिंक बनवू शकता. यासाठी सफरचंद आणि दालचिनी पाण्यात मिसळून प्यायल्याने चयापचय बरोबर राहते आणि पोटही बराच काळ भरलेले राहते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com