Online Fraud Saam Tv
लाईफस्टाईल

Online Fraud : स्पॅम कॉलर्सना तुमचा नंबर कुठून मिळतो? जाणून घ्या सविस्तर

Spam Calls : फ्रॉड करणारे विविध मार्गांनी आपल्याला त्यात अडकवण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना आपली सर्व माहिती कुठून मिळतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

Shraddha Thik

How Do Fraudsters Get Our Details :

फ्रॉड करणारे विविध मार्गांनी आपल्याला त्यात अडकवण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना आपली सर्व माहिती कुठून मिळतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? फसवणूक करणारे तुमची सर्व माहिती अनेक प्रकारे चोरू शकतात. त्यापैकी काही पर्याय आपण येथे पाहूयात. या माहितीच्या आधारेच फसवणूक (Fraud) करणारे तुमच्यासोबत फ्रॉड करतात. जाणून घेऊयात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कधी स्कॅमर (Scamer) लोकांना सेक्सटोर्शनद्वारे, तर कधी SMSच्या मार्फत आणि कधी आपल्या चुकांमुळे त्यांना आपली माहिती मिळते. काही स्कॅमर्सकडे तुमचा संपुर्ण डेटा (Data) उपलब्ध असतो. उदाहरणार्थ, तुमचे नाव, पत्ता आणि इतर माहिती त्यांकडे असते.

या सर्व माहितीच्या आधारे हे स्कॅमर्स अनेक प्रकारे फसवणूक करतात, तसेच आधार कार्डच्या साहाय्याने स्कॅमर्स फसवणूक जास्त प्रमाणात करतात. फसवणुकीच्या या प्रकारात, स्कॅमर्स तोतया पोलिस अधिकारी बनून फोन करतात आणि कायदेशीर कारवाईची धमकी देऊन टार्गेट करतात. असे स्कॅम पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतो की स्कॅमर्सना तुमची माहिती कुठून मिळते?

पहिले कारण म्हणजे आपण जे हॅन्डसेट वापरतो त्या सर्व युजर्सचा डेटा डार्क वेबवर विकला जातो. हा डेटा कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून लीक होऊ शकतो. उदाहरणार्थ, तुमचा फोन नंबर, आधार कार्ड नंबर, पत्ता आणि इतर माहिती, या माहितीच्या आधारे, फसवणूक करणारे खऱ्या अधिकाऱ्यांप्रमाणे वागतात आणि तुम्हाला धमकावतात.

तुम्ही तुमचा नंबर शॉपिंग मॉलमध्ये नोंदवता, ज्यामुळे तुम्हाला SMS आणि कॉल येऊ शकतात. स्कॅमर्सनी हा डेटा मिळवल्यास, त्यांना अनेक युजर्सची नावे, नंबर आणि इतर माहितीही मिळतील.

फिशिंग ईमेल या वेबसाइटवरूनही सर्वात सामान्य पद्धतीने स्कॅमर ईमेल किंवा एसएमएसद्वारे फिशिंग लिंक पाठवतात. आणि या लिंकवर क्लिक करताच ते काही बनावट वेबसाइटवर पोहोचतात. येथून स्कॅमर युजर्सचे सर्व माहिती चोरतात. स्कॅमर या लिंक्सच्या मदतीने तुमच्या फोनवर काही स्पायवेअर इंस्टॉल करू शकतात.

त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या बनावट वेबसाइटला भेट दिल्यास, स्कॅमर तिथूनही तुमचे सर्व माहिती चोरतात. या वेबसाइट्स अगदी खऱ्या असल्यासारखे भासतात, परंतु त्यांचे काम युजर्सचे डेटा चोरणे असते.

याशिवाय तुम्हाला कोणी फोन करून बनावट पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाने धमकावत असेल तर शांतपणे विचार करा. घाई करू नका अन्यथा फसवणूकीला बळी पडाल. कोणत्याही अज्ञात व्यक्तीला पेमेंट ट्रान्सफर करू नका. तसेच कोणत्याही प्रकारचा OTP शेअर करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Idli Recipe : रात्रीचा भात भरपूर उरलाय? झटपट बनवा मऊसर इडली

Nirmiti Sawant : निर्मिती सावंत यांचे छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक; डॅशिंग लूकनं वेधलं लक्ष, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Viral Video: बाईक स्टंटचा प्रयत्न जीवावर बेतला, तोंडावर आपटल्याने तरुण जखमी; VIDEO

Morning Health Tips: सकाळच्या 'या' सवयी आरोग्यासाठी ठरतात वरदान

SCROLL FOR NEXT