Online Shopping Fraud : ऑनलाइन शॉपिंग करताय? Amazon-Flipkart वरुन बनावट प्रोडक्ट्स मिळाल्यास तुम्ही काय करावे?

Amazon-Flipkart : अनेक वेळा लोक ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणुकीला बळी पडतात.
Online Shopping Fraud
Online Shopping FraudSaam Tv
Published On

Online Shopping :

सणासुदीच्या काळात ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर बऱ्याच सवलती मिळतात. अशातच आता दिवाळी जवळ येत आहे तर अशातच अनेक लोकांना बाजारपेठेसह ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर खरेदी करायला आवडते. तसेच Amazon, Flipkart सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे खरेदी करणे खूप सोपे आहे.

तुम्हाला तुमच्या आवडीची सर्व उत्पादने एका क्लिकवर मिळतात. तुमच्या इच्छेनुसार विविध फिल्टर्स लावून तुम्ही स्वतःसाठी एक परिपूर्ण उत्पादन शोधू शकता. यासोबतच या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला आकर्षक सवलती मिळतात. वापरकर्त्यांना फ्लॅट डिस्काउंटसह बँक ऑफर आणि एक्सचेंज बोनस मिळतात. या सर्व ऑफरनंतर (Offers) तुम्हाला सर्वोत्तम डील मिळेल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तसेच, तुम्हाला उत्पादने सुरक्षितपणे घरी आणण्याची काळजी करण्याची गरज नाही, कारण ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ही उत्पादने तुमच्या घरी पोहोचवतात. अशाप्रकारे, ऑनलाइन (Online) शॉपिंग अनेक लोकांसाठी एक परिपूर्ण मार्ग बनते, परंतु असे बरेच लोक आहेत ज्यांच्यासाठी कधी त्यांनी मागवलेल्या प्रोडक्ट्स डीफॉल्ट मिळतात.

जर तुम्हाला डीफॉल्ट प्रोडक्ट्स सापडले तर काय करावे?

प्रोडक्ट्स खरेदी करताना तुम्ही खाली दिलेल्या पर्याय निट निवडावे. काही कंपन्या (Company) ओपन बॉक्स डिलिव्हरीचा पर्याय देतात. या पर्यायासह खरेदी केलेली उत्पादने डिलिव्हरीपूर्वी अनबॉक्स डिलिव्हरी अशा पर्यायांसह दाखवली जातात. मात्र, हा पर्याय निवडल्यानंतरही तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

Online Shopping Fraud
Amazon-Flipkart पेक्षाही स्वस्त सामान खरेदी करा, सरकारच्या अधिकृत अ‍ॅप GeM वर मिळतेय मुबलक प्रमाणात सुट

व्हिडिओ नक्की बनवा

तुम्ही एखादे प्रोडक्ट उघडत असताना त्याचा व्हिडिओ बनवा. जर तुम्हाला बनावट किंवा डीफॉल्ट प्रोडक्ट मिळाले तर ते बदलणे सोपे आहे. फोटो क्लिक करण्यापेक्षा व्हिडिओ रेकॉर्ड करणे हा एक चांगला पर्याय आहे.

ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे संपर्क साधा

तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मवरून खरेदी केली असेल त्या ग्राहक सेवांशी संपर्क साधावा. यासाठी तुम्हाला त्या अ‍ॅप किंवा वेबसाइटवर लॉगिन करून तुमची तक्रार नोंदवावी लागेल. इच्छित असल्यास, मेलद्वारे देखील आपला मुद्दा स्पष्ट करू शकता. पुरावा म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेअरही करू शकता.

Online Shopping Fraud
ऑफर्सचा पाऊस! Amazon-Flipkart चा फेस्टिव्ह सेलला उरले फक्त काहीच तास, गॅजेट घेण्यासाठी या बेस्ट टिप्स लक्षात ठेवा

सोशल मीडियावर आवाज उठवा

कंपनी तुमचे ऐकत नसेल तर, तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सोशल मीडियावर हा मुद्दा मांडू शकता. सोशल मीडियावर अनेक कंपन्या सक्रिय आहेत. तिथे लगेच प्रतिसाद मिळतो. एवढे करूनही जर तुमची समस्या सुटली नाही तर तुम्ही ग्राहक फॉर्ममध्ये तक्रार करू शकता.

ग्राहक मंचात (Consumer Forum) तक्रार करा

सरकारने लोकांना मदत करण्यासाठी अनेक पर्याय दिले आहेत. तुम्ही https://consumerhelpline.gov.in/ वर जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकता किंवा तुम्ही थेट ग्राहक मंच क्रमांकावर तक्रार करू शकता.1800-11-4000

Online Shopping Fraud
Amazon-Flipkart Sale: 11.35 इंचाचा डिस्प्ले, 8GB रॅम, 256GB स्टोरेज; OnePlus च्या Tablet वर मिळत आहे जबरदस्त सूट

ही सुविधा 1915 एसएमएस, एनसीएच अॅप आणि उमंग अॅपवरही उपलब्ध आहे. यावर तक्रार करण्यासाठी, तुम्हाला नोंदणी करावी लागेल आणि नंतर तुमची कागदपत्रे अपलोड करावी लागतील. तुम्ही तुमच्या तक्रारीचा मागोवा देखील घेऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com