Maharashtra Politics: राज ठाकरे मविआत सामिल होणार? मनसेसाठी शरद पवार आग्रही?

Raj Thackeray joining MVA Alliance: मनसेच्या मविआमधील समावेशावर पहिल्यांदाच शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलंय. शरद पवारांनी मित्रपक्ष काँग्रेसला काय सल्ला दिलाय? पवारांची भूमिका काँग्रेसच्या हायकंमाडला मान्य होणार का?
Sharad Pawar hints at supporting Raj Thackeray’s MNS entry into the Maha Vikas Aghadi, sparking political discussions across Maharashtra.
Sharad Pawar hints at supporting Raj Thackeray’s MNS entry into the Maha Vikas Aghadi, sparking political discussions across Maharashtra.Saam Tv
Published On

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युतीची औपचारिक घोषणा होणं बाकी आहे. मात्र मनसे मविआमध्ये सामील होणार का... मविआतील घटक पक्ष राज ठाकरेंना हिरवा कंदील दाखवणार का असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झालेले असतांना आता शरद पवारांनी राज ठाकरेंसाठी एक पाऊल पुढे टाकलंय. मनसेच्या मविआमधील समावेशावर पहिल्यांदाच शरद पवारांनी मोठं वक्तव्य करत मित्रपक्ष काँग्रेसला सल्ला दिलाय...

शरद पवार मनसेच्या मविआतील समावेशासाठी आग्रही असल्याचं चित्र दिसत असतानाच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या सोबत थेट जागावाटपापर्यंत चर्चा केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे मनसेच्या प्रवेशाला विरोध करणाऱ्या राज्यातील काँग्रेस नेत्यांनी मनसे विरोधात घेतलेल्या प्रखर विरोधाच्या भूमिकेचं काय होणार असाही प्रश्न आहे.

शहरी भागातील अनेक प्रभागांमध्ये मनसेकडे मोठी व्होट बँक आहे. अनेक मराठीबहुल मतदारसंघात मनसेला मानणारा एक मोठा वर्ग असल्यानं त्याचा फायदा लोकसभा निवडणूकीत एनडीएला झाला होता. विधानसभेत मनसेला एकही जागा जिंकता आली नसली तरी मत खेचण्यात राज ठाकरे यशस्वी झाले होते. मतांचे गणित जुळवत शरद पवारांनी घेतलेली ही भूमिका काँग्रेस हायकंमाडचं मन वळवण्यात यशस्वी होते का? आणि मनसे कॉग्रेंस आणि समाजवादीसारख्या पक्षांसोबत जुळवून घेणार का हे येत्या काळात पाहायला मिळेलच.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com