सध्या अनेक लोक कामात इतके व्यस्त असतात की, त्यांना स्वत:साठी वेळ देता येत नाही. सतत कामाचा ताण सहन करावा लागतो. मग अशा वेळेस त्यांना शांततेची गरज असते. कोणत्याही व्यक्तीचं डोकं शांत असेल तरच ती व्यक्ती व्यवस्थित काम करू शकते. त्यासाठी चॉकलेट ड्रिंक फायदा खूप मोठ्या प्रमाणात होतो. चॉकलेट ड्रिंक चविष्टच नाही.
आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंट्स, टॅमिन्स आणि खनिजे असतात, जी शरीराला अनेक फायदे मिळवून देतात. चॉकलेट ड्रिंक तयार करण्याच्या पावडरमध्ये अनेक महत्वाचे गुणधर्म असतात. जे शरीराच्या अनेक भागांसाठी सुद्धा महत्वाचे असतात. चॉकलेट ड्रिंकचे सेवन केल्याने शरीर दिवसभर उत्साही राहते. त्याने कामाचा ताण कमी होतो.
चॉकलेट ड्रिंकमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण सुद्धा असते. त्यान मन शांत होत. तुमचा चिडचिडपणा कमी होतो. कोको पावडरमध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात, जे रक्ताभिसारण सुधारण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यास मदत करतात. चॉकलेट ड्रिंक प्यायल्याने तुमच्या त्वचेचा तजेलदारपणा वाढतो. त्यामुळे कमी वयात चेहऱ्यावर दिसणारे वृद्धत्वसुद्धा कमी होते. चला तर जाणून घेऊ चॉकलेट ड्रिंकची स्पेशल क्वीक रेसिपी.
चॉकलेट ड्रिंक रेसिपी
साहित्य
२ कप दूध
2 टेबलस्पून कोको पावडर
2 टेबलस्पून साखर (आवडीनुसार कमी-जास्त करा)
१/२ टीस्पून व्हॅनिला एसेन्स
चिमूटभर दालचिनी पावडर (ऐच्छिक)
कृती
एका पातेल्यात दूध गरम ठेवा. दूध गरम करताना ते ढवळत राहा. एका ग्लासात कोकोपावडर घ्या आणि त्यात गरम दूध ओता. दूध सतत ढवळत राहा. आता त्यात व्हॅनिला एसेन्स आणि दालचिनी पावडर चांगल्या पद्धतीने मिक्स करा. आणि दोन मिनिटात तयार आहे तुमचे चॉकलेट ड्रिंक. हे तुम्ही थंड करून सुद्धा सेवन करू शकता.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.