Shreya Maskar
होममेड चॉकलेट बनवण्यासाठी पिठी साखर, बटर, व्हॅनिला इसेन्स, दुधाची पावडर, कोको पावडर आणि ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.
होममेड चॉकलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम डबल-बॉयलरमध्ये बटर, साखर, कोको पावडर आणि दुधाची पावडर घालून छान मिक्स करा.
त्यानंतर या मिश्रणात व्हॅनिला इसेन्स घालून एकजीव करा.
जेव्हा मिश्रण घट्ट होईल तेव्हा चॉकलेट मोल्डमध्ये घाला.
वरून मोल्डमध्ये तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकून पुन्हा चॉकलेटचा लेअर द्या.
चॉकलेट मोल्ड २-३ तास फ्रिजमध्ये सेट करायला ठेवून द्या.
शेवटी चॉकलेटवर पिठी साखर भुरभुरवा.
कमी खर्चात चविष्ट घरगुती चॉकलेट तयार झाले.