Shreya Maskar
चिली पनीर बनवण्यासाठी कांद्याची पात, शिमला मिरची, गाजर, बीन्स, कांदा, आले, लसूण, हिरवी मिरची, पनीर, मीठ , मिरपूड, कॉर्नफ्लोर आणि चिली पनीर मसाला इत्यादी साहित्य लागते.
चिली पनीर बनवण्यासाठी सर्वप्रथम शिमला मिरची आणि कांद्याचे चौकोनी तुकडे करून हिरवा कांदा आणि कांद्याची पाने,लसूण, आले , गाजर, बीन्स बारीक चिरून घ्या.
पनीरचे तुकडे करून त्यावर कॉर्नफ्लोर ,हळद, मीठ आणि लाल तिखट टाकून सर्व मिक्स करून तेलात तळून घ्या.
आता पॅनमध्ये तेल टाकून त्यात चिरलेला लसूण, आले, कांदा आणि हिरवी मिरची घालून हलकेच परतून घ्या.
त्यात कांदा, शिमला मिरची, गाजर आणि बीन्स आणि मीठ घालून मिक्स करा.
एका भांड्यात मिरचीचा पनीर मसाला काढून पाण्यात विरघळवून भाज्यांसह पॅनमध्ये घाला.
त्यानंतर पॅनमध्ये कॉर्नफ्लोर, तळलेले पनीर, कांद्याची पात, चवीनुसार मीठ आणि काळी मिरी घालून मिक्स करा.
चटपटीत चिली पनीर खाण्यासाठी तयार झाले आहे.