Shreya Maskar
डोनट बनवण्यासाठी मैदा, बटर, मीठ, पिठीसाखर, यीस्ट, दूध , तेल, डार्क चॉकलेट, व्हाइट चॉकलेट, सिल्वर शुगर कोटेड बॉल्स इत्यादी साहित्य लागते.
डोनट बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये मैदा, बटर, पिठीसाखर, यीस्ट, कोमट दूध घालून एकत्र करुन घ्या.
तेलाच्या हाताने पीठ चांगले मळून घ्या आणि डोनट कटरच्या साहाय्याने कट करा.
आता डोनट ताटात घेऊन त्यावर मैदा शिंपडून ठेवा.
पॅनमध्ये तेल गरम करून मध्यम आचेवर डोनट्स दोन्ही बाजूने तळून घ्या.
डोनट्सची वरची बाजू वितळलेल्या चॉकलेटमध्ये घोळवून घ्या.
डोनट्स गरमागरम सर्व्ह करा.
डोनट्सची चव वाढवण्यासाठी तुम्ही यात ड्रायफ्रूट्स घाला.