प्रेम व्यक्त करणे कठीण गोष्ट असते. कारण आपण आपल्या भावना त्या व्यक्तीला सांगणार असतो. त्याच उत्तर काय असेल या विचाराने आपण प्रथम घाबरतो. मात्र वेळच्या वेळी भावना व्यक्त करणे गरजेचे असते.
आपल्या भावना नसताना समोरून कोणी प्रपोज केल्यावर समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाऊ नये म्हणून 'नाही' म्हणण्यास अनेक लोक घाबरतात. पण वेळेवर नाही बोलणे देखील गरजेचे असते. नाहीतर भविष्यात अडचणी येतात. नाही बोलण्याची एक पद्धत असते. समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा अनादर न करता तुम्ही त्या व्यक्तीला नाही बोलावे.
संवाद साधा
अनेक वेळा आपल्या भावना नसताना देखील कोणतरी आपल्यावर प्रेम करत हे समजताच अनेक जण त्या व्यक्तीशी बोलणे बंद करतात. पण हे चुकीचे आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या भावना खूप दुखावल्या जातात. शांतपणे त्या व्यक्तीशी संवाद साधून तुम्ही तो प्रश्न सोडवायला हवा.
भावनांचा आदर करा
एखादी जवळची व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत असेल आणि तिने तुम्हाला प्रपोज केला. मात्र तुम्हाला तिच्याविषयी प्रेम भावना नसतील तर तिला न दुखावता तिच्या भावनांचा आदर करून तिला नकार द्या. जवळच्या व्यक्तींना नकार देणे खूप कठीण जाते. पण योग्य वेळी बोलणे गरजेचे असते. तुम्ही प्रमाणिकपणे उत्तर दिल्यास तुमची मैत्री तरी चांगली राहील. यामुळे तुमची आणि समोरच्या व्यक्तीची कोणाचीच चिडचिड होणार नाही. नात्यांचा गुंता वाढणार नाही. फुकट त्याला काय वाटेल या भीतीने खोटं नातं तयार करू नका. कारण भविष्यात याचा दोघांनाही त्रास होईल.
मैत्री
अनेक वेळा मैत्रीचे रुपातंर होते. काही वेळा तुमच्या मोकळ्या वागण्याला समोरचा व्यक्ती प्रेम समजून बसतो. यामुळे मैत्रीत सुरुवातीपासून मर्यादा ठेवा. अशावेळी एकमेकांबद्दल गैरसमज करून घेण्यापेक्षा तो क्षण हळूवारपणे सांभाळा. प्रपोज केल्यावरही तुम्हाला त्या व्यक्तीशी मैत्री ठेवायची असेल तर विशेष काळजी घ्या. जेणेकरून त्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाणार नाही.
खोटी आशा दाखवणे टाळा
अनेक वेळा आपल्याला माहित असत की, समोरच्या व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत आहे. पण तुम्हाला त्याच्याबद्दल प्रेम भावना नसतील. तर त्याला या गोष्टी स्पष्ट करा. उगाच त्या व्यक्तीला खोटी आशा दाखवू नका.
चिडचिड करू नका
नात्यात कधीही चिडून कोणताही प्रश्न सुटत नाही. उलट आपल्याला त्याचा त्रास होतो. त्यामुळे समोरच्यावर चिडू नका. त्याला सांभाळून घ्या. बऱ्याचदा असे होते की, तुमच्या ध्यानीमनी नसताना तुम्हाला प्रपोजचा सामना करावा लागतो. त्यामुळे चिडचिड होते. पण अशावेळी शांत राहणे कधीही चांगले. त्या व्यक्तीची परिस्थिती समजून सोम्य भाषेत तिला नकार द्या. नाहीतर त्या व्यक्तीला अपमान झाल्याची भावना येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.