kitchen Cleaning Tips Saam Tv
लाईफस्टाईल

kitchen Cleaning Tips: किचन कॅबिनेटमधून येणारी दुर्गंधी आणि घाण साफ करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ठरतील प्रभावी

kitchen Tips: प्रत्येकजण स्वत:चे सुंदर दिसावे यासाठी अधिक मेहनत घेत असतात. जर स्वयंपाक घराची गोष्ट येत असेल तर प्रत्येकजण ते स्वच्छ ठेवण्यासाठी अधिक मेहनत घेतो. मात्र स्वयंपाक घरातील कॅबिनेटची स्वच्छता कशी करावी असा प्रश्न नेमका पडतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घरातील मुख्य असे हे स्वयंपाकघर असते. किचनचे सौंदर्य वाढवण्यात आणि किचनमध्ये विखुरलेल्या सर्व वस्तु व्यवस्थित ठेवण्यासाठी कॅबिनेटची महत्त्वाची भुमिका दिसून येते. मात्र अनेकदा घाणेरड्या आणि ओल्या हातांनी कॅबिनेटला हात लावल्यास त्यावर अनेक डाग लागतात तसेच त्यामधील अनेक वस्तू खराब होण्यासही सुरुवात होते.

अनेकदा स्वयंपाक घरातूल कुबट वास येतो,त्यामुळे स्वयंपाक घरात (kitchen)जाण्याची इच्छाही होत नाही. त्यामुळे किचन साफ करण्यासोबत स्वयंपाकघरातील कॅबिनेट स्वच्छ करणे महत्त्वाचे असते. दर आठवड्यामध्ये स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासोबत कॅबिनेटही स्वच्छ करावे. आम्ही सांगत असलेल्या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही स्वयंपाकघरातील महत्त्वपूर्ण कॅबिनेट स्वच्छ करु शकता.

स्वयंपाक घरातील प्लास्टिक कॅबिनेट कसे स्वच्छ करावे जाणून घ्या

साबण आणि गरम पाणी

स्वयंपाक घरातील प्लास्टिक कॅबिनेट नव्यासारखे चमकवण्यासाठी लिंबाचा रस अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी सुरुवातीस तुम्ही एक कप कोमट पाणी घ्याले त्या कोमट पाण्यात साधारण ३-४ लिंबाचा रस मिस्क करा. मग एक स्वच्छ(clean) कापड घेऊन त्या पाण्यात बुडवा. त्या कापडाने सर्व प्लास्टिक कॅबिनेट स्वच्छ करा. अशा पद्धतीने तुम्ही प्लास्टिक कॅबिनेट स्वच्छ केल्यास सर्व असलेले डाग निघण्यासही मदत होते तसेच कॅबिनेट नव्यासारखे दिसते.

लाकडी कॅबिनेट कसे स्वच्छ करावे

बेकिंग सोडा आणि लिंबू

जसे तुम्ही कोमट पाणी आणि लिंबूच्या (lemon) साहाय्याने प्लास्टिक कॅबिनेट स्वच्छ केले आता लाकडी कॅबिनेट स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबाची मदत होईल. त्यासाठी सुरुवातीस स्वयंपाक घरात उपलद्ध असलेला बेकिंग सोडा २ चमचे घ्या. त्यात काही प्रमाणात लिंबाचा रस मिसळा शिवाय एक कप गरम पाणी घाला. हे सर्व मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरुन घ्या. बाटलीत भरलेले मिश्रण लाकडाच्या कॅबिनेटवर मारून ते १५ ते ३० मिनिटे तसेच ठेवून द्या. शेवटी एका स्वच्छ कापडाने लाकडी कॅबिनेट पुसून घ्या.

पांढरा व्हिनेगर

पांढरा व्हिनेगर वापरुनही लाकडी कॅबिनेट स्वच्छ करता येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला एक कप साधारण पाण्यात चार चमचे व्हाईट व्हिनेगर आणि दोन चमचे खोबरेल तेल मिसळा. हे झालेले मिश्रणाच्या मदतीनेही तुम्ही लाकडी कॅबिनेट स्वच्छ करु शकता.

डिस्क्लेमर - सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

Worli Fort : पावसाळ्यात फक्त १०० रुपयांत वरळी जवळच्या या किल्ल्याला द्या भेट

SCROLL FOR NEXT