How To Get Black Hair Naturally : आजकाल वयाअभावी केसगळती, अकाली पांढरे होणे व केसाची वाढ थांबणे यासारख्या समस्यांना समोरे जावे लागत आहे. बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी व प्रदुषणांमुळे केसांवर जास्त परिणाम होतो.
तसेच यामुळे त्वचेचे व केसांचे अधिक नुकसान होते आहे. वाढत्या कामाचा ताण आणि विविध प्रकारच्या समस्यांमुळे आजकाल लोक सतत अनेक समस्यांना बळी पडत आहेत. अशावेळी त्वचा आणि केसांच्या आरोग्याचीही (Health) काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
केस अकाली पांढरे होणे हा आजकाल अनेकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. पांढऱ्या केसांमुळे लोकांना अनेकदा लाजिरवाणेपणाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत पांढऱ्या केसांना लपवण्यासाठी लोक हेअर डाईचा वापर करतात. पण हे केमिकल हेअर कलर कधी कधी केसांना इजा करतात. जर तुम्ही देखील केसगळती, केसांची वाढ थांबणे व अकाली पांढऱ्या होणाऱ्या केसांमुळे त्रस्त असाल तर या 3 गोष्टींचा वापर नक्की करुन पाहा
1. एरंडेल तेल (Oil)
कूलिंग इफेक्टमुळे, एरंडेल तेल शरीरातील अतिरिक्त पित्तापासून बचाव करते, ज्यामुळे केस अकाली पांढरे होण्याची समस्या सोडवली जाऊ शकते.
2. आवळा तेल
व्हिटॅमिन-सी समृद्ध आवळा तेल केसांना ऑक्सिडेटिव्ह डॅमेजपासून वाचवते. अशा स्थितीत याच्या वापराने केस बराच काळ काळे राहतात.
3. जास्वंद
खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध, जास्वंद केसांच्या कूपांचे आरोग्य सुधारते. निरोगी फॉलिकल्स मेलेनिनचे उत्पादन वाढवतात, ज्यामुळे केस पांढरे होण्यास प्रतिबंध होतो.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.