Tan Removal Saam TV
लाईफस्टाईल

Tan Removal : फक्त ५ रुपये खर्च करा, संपूर्ण टॅनींग होईल दूर; कसं? वाचा सविस्तर

Ruchika Jadhav

उन्हाळ्यात बाहेर फिरताना किंवा गावी गेल्यावर लगेचच स्किन टॅन होते. चेहऱ्यावर आणि हाता-पायांवर इतका टॅन येतो की आपण पूर्णत:काळे दिसू लागतो. टॅन झालेला चेहरा कुणालाच आवडत नाही. त्यामुळे अनेक व्यक्ती उन्हात जाण्याआधी सनस्क्रीन अप्लाय करतात. मात्र त्यानेही काहीच फरक पडत नाही.

सनस्क्रीन लावून देखील काही व्यक्तींची स्किन जास्त टॅन होते. स्किनवरील टॅन घालवण्यासाठी काही जण विविध कॉसमेटीक्सचा वापर करतात. मात्र महागडे प्रोडक्ट तुमच्या चेहऱ्याला सूट न झाल्यास स्किन आणखी खराब होते. काहींना पिंपल्स देखील येतात. त्यामुळे महागडे प्रोडक्ट न वापरता घरच्या घरी फक्त ५ रुपये खर्च करून तुम्ही चेहऱ्यावरील टॅन दूर करू शकता.

फक्त ५ रुपयांत काकडीमुळे चेहऱ्यावारील टॅन गायब होईल. काकडीमध्ये विविध जीवनसत्व आणि व्हिटॅमीन अलतात. हे व्हिटॅमीन आपल्या स्किनसाठी फार उपउक्त ठरतात. त्यामुळे आहारात काकडीचा समावेश असावा. त्यासह काकडीने टॅनींग दूर करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

आधी काकडीची साल कापून घ्या.

त्यानंतर या काकडीमध्ये बारीक तुकडे करून घ्या.

त्यानंतर मिक्सरला याची स्मुथ पेस्ट बनवून घ्या.

काकडीमध्ये पाणी असतं त्यामुळे वरून जास्तीचं पाणी मिक्स करू नका.

या पेस्टमध्ये नंतर अॅलोवेरा जेल देखील मिक्स करा.

तयार पेस्ट एका काचेच्या बरणीत भरून ठेवा. त्यानंतर रोज रात्री झोपताना ही पेस्ट चेहऱ्यावर अप्लाय करा. असे केल्याने चेहऱ्यावरील टॅनींग पूर्णता निघून जाईल. ही पेस्ट तुम्ही दररोज लाण्याची सवय ठेवली तर तुमच्या स्किन संबंधीत सर्व समस्या दूर होतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT