Beauty Tips: धूळ, प्रदूषण व खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे चेहऱ्यावर मुरुमे येतात. आपल्यापैकी अनेकांना ते फोडण्याची सवय असते. त्यामुळे चेहऱ्यावर डाग राहातात व चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते.
मुरुमांपासून मुक्त होण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत, परंतु जर तुमची त्वचा आतून स्वच्छ राहिली, तर तुम्हाला मुरुमांच्या समस्येपासूनही सुटका मिळण्याची शक्यता आहे, म्हणून आज आम्ही असे घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे पिंपल्सची समस्या दूर होईल व त्वचा तजेलदार राहण्यास मदत होईल.
1. कडुलिंबाच्या पानांचे फायदे
कडुलिंबाच्या पानांपासून फळे, फुले, बिया, देठ, म्हणजे सर्व काही गुणांनी परिपूर्ण आहे. कडुलिंब हे वृद्धत्व विरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. कडुलिंब त्वचेला हानिकारक अतिनील किरण, प्रदूषण आणि वातावरणापासून संरक्षण देते. कडुलिंबातील जीवनसत्त्वे आणि फॅटी ऍसिडस् त्वचेची लवचिकता राखतात, ज्यामुळे अकाली सुरकुत्या येण्यापासून बचाव होऊ शकतो.
2. पुदिन्याचे फायदे
पुदिन्यात व्हिटॅमिन (Vitamins) ए, लोह, फायबर (Fiber) असते. यासोबतच यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात जे त्वचेसाठी (Skin) फायदेशीर असतात. पुदिना मृत त्वचा काढून टाकते आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करते. हानिकारक बॅक्टेरिया काढून टाकते, जे मुरुमांच्या समस्येसाठी जबाबदार असतात.
3. हळदीचे फायदे
हळदीचा प्रतिजैविक प्रभाव मुरुम टाळण्यासाठी उपयुक्त आहे. हळदीच्या वापराने त्वचेचा रंग सुधारतो. यासोबतच वेळेआधी दिसणाऱ्या सुरकुत्याही गायब होऊ लागतात.
4. पिंपल्स (Pimples) दूर करण्यासाठी प्रभावी फेस पॅक
कडुलिंबाची पाने घेऊन ती धुवून स्वच्छ करा. त्यात थोडी पुदिन्याची पाने घाला. याशिवाय ते बनवण्यासाठी थोडी हळद लागेल. सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाका आणि थोडे पाणी घालून बारीक करा. हे मिश्रण बर्फाच्या ट्रेमध्ये ओता आणि गोठवा. दिवसातून दोनदा पिंपल्सच्या ठिकाणी याचा वापर करावा. तसेच हा पॅक संपूर्ण चेहऱ्यावर देखील वापरू शकता. पिंपल्सची समस्या तर दूर होईलच त्याचबरोबर चेहऱ्यावरील डागही दूर होतील. चेहऱ्यावर नैसर्गिक चमकही येईल.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.