

तेलुगू चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गिरी बाबू यांचे निधन
गिरी बाबू यांच्या निधनाने तेलुगू चित्रपटसृष्टीवर शोककळा
हैदराबादमधील खासगी रुग्णालयात गिरी बाबू यांची प्राणज्योत मालवली
तेलुगू चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गिरी बाबू यांचे शनिवारी निधन झाले. १४ नोव्हेंबर रोजी हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच मनोरंजन विश्वात शोककळा पसरलीय. गिरी बाबू यांच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. तेलुगू चित्रपटसृष्टीतील एक प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक असलेले गिरी बाबू यांनी आपल्या जवळपास पाच दशकांच्या कारकिर्दीत ६०० हून अधिक चित्रपटांत काम केलंय.
ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू आणि अनिल रविपुडी यांच्यासह अनेक दिग्गज व्यक्तींनी आपापल्या 'एक्स' (ट्विटर) हँडलवरून गिरी बाबू यांना श्रद्धांजली वाहिली. गिरी बाबू हे एक सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते होते. पाच दशकांच्या आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी ६०० हून अधिक चित्रपटांत काम केले. आपल्या अविस्मरणीय अभिनयाद्वारे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. अभिनयासह त्यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
मेगास्टार चिरंजीवी यांनी 'एक्स' (ट्विटर)च्या माध्यमातून गिरी बाबू यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. चिरंजीवी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं की, तेलुगू चित्रपटसृष्टीत अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. "प्रसिद्ध अभिनेते गिरी बाबू आता आपल्यात नाहीत, ही बातमी ऐकून मला मोठा धक्का बसला आहे."
तेलुगू चित्रपटसृष्टीत अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून गिरीबाबू यांनी दिलेले योगदान जे त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने आणि वैशिष्ट्यपूर्ण शैलीने नटलेले होते. ते सदैव स्मरणात राहतील. त्यांचे निधन ही तेलुगू चित्रपटसृष्टीसाठी एक न भरून निघणारी हानी आहे. मी देवाकडे प्रार्थना करतो की, त्यांच्या दिवंगत आत्म्याला शांती लाभो... मी त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. अशी पोस्ट अभिनेते चिरंजीवी यांनी केलीय.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनीही गिरी बाबू यांनी श्रद्धांजली वाहिलीय. 'एक्स' (X) वर एका पोस्टमध्ये लिहिले की, "ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते गिरी बाबू यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. प्रकाशम जिल्ह्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले गिरी बाबू यांनी आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत ६०० हून अधिक चित्रपटांत काम केलंय. खलनायक, विनोदी कलाकार आणि चरित्र अभिनेता अशा विविध भूमिकांतून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. मी त्याच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना मनापासून संवेदना व्यक्त करतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.