Holi 2024, Effective Tips To Remove Holi Colour From Face  Saam Tv
लाईफस्टाईल

Holi 2024 : होळी खेळल्यानंतर त्वचेला लागलेला रंग कसा काढाल? या सोप्या घरगुती टीप्स फॉलो करा

Effective Tips To Remove Holi Colour From Face : सध्या बाजारात अनेक केमिकलयुक्त रंग पाहायला मिळतात. जे चेहऱ्यावर लावल्यानंतर निघता निघत नाही. यामुळे चेहरा आणि केसांवरील रंग काढण्यासाठी आपण साबण आणि शाम्पूचा वापर करतो.

कोमल दामुद्रे

How To Remove Holi Colour From Face :

यंदा होळीचा सण हा २४ मार्चला साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्यात येईल. होळीनंतर दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण केली जाते.

सध्या बाजारात अनेक केमिकलयुक्त रंग पाहायला मिळतात. जे चेहऱ्यावर लावल्यानंतर निघता निघत नाही. यामुळे चेहरा आणि केसांवरील रंग काढण्यासाठी आपण साबण आणि शाम्पूचा वापर करतो. यामुळे अनेकदा त्वचेवर (Skin) अॅलर्जी होते. त्यासाठी रंगांसोबत खेळताना अधिक काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही काही घरगुती टीप्स (Home remedies) फॉलो केल्या तर आपल्याला सहज रंग काढता येईल.

1. तेल

होळीच्या दिवशी (Holi Festival) हट्टी रंगांपासून सुटका करण्यासाठी तुम्ही तेलाचा वापर करु शकता. तुम्ही आंघोळीपूर्वी तेल लावल्याने रंग निघून जाण्यास मदत होईल. तेलामध्ये तुम्ही खोबऱ्याचे तेल किंवा ऑलिव्ह ऑईल वापरु शकता.

2. काकडीचा वापरा

होळीच्या वेळी लावलेला हट्टी रंग काकडीच्या मदतीने काढता येतो. हट्टी रंग काढण्यासाठी तुम्ही काकडीचा रस वापरु शकता. काकडीला गुलाब पाण्यात मिसळून वापरल्याने चेहऱ्यावरील रंग निघून जाण्यास मदत होईल.

3. बर्फ वापरा

होळीच्या दिवशी घराबाहेर पडण्यापूर्वी त्वेचवर बर्फ लावा. बर्फामुळे त्वचेचे छिद्र बंद होतात. चेहरा धुतल्याने बर्फाच्या तुकड्याने हलक्या हाताने १० मिनिटे मसाज करा. यामुळे रंग छिद्रात अडकून राहाणार नाही.

4. या गोष्टी वापरु नका

रंग काढण्यासाठी गरम पाण्याचा वापर करु नका. जर तुम्ही गरम पाणी वापरत असाल तर त्याचा रंग फिकट होण्याऐवजी घट्ट होऊ शकतो. त्वचेला हानी पोहोचवतील अशा गोष्टीचा वापर करु नका.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

Crime: कोचकडून हॉकी खेळाडूवर बलात्कार, स्टेडिअमच्या बाथरूमध्ये नेलं अन्...; पीडित मुलगी गरोदर

X युजर्स सावधान! हे नियम पाळा नाहीतर तुमचंही अकाउंट होईल Delete

Maharashtra Live News Update : माजी आमदार शिरीष चौधरींच्या घरावर हल्ला, राजकीय षडयंत्र

Bigg Boss House: बिग बॉस मराठी६ सुरू होण्याआधी घराची पहिली झलक आली समोर; रहस्यांनी भरलेल्या घरात काय आहे नवीन?

SCROLL FOR NEXT