Holi 2024, Acidity Problem, Post Holi Detox Saam Tv
लाईफस्टाईल

Post Holi Detox : होळीत खा खा खाल्ले? अपचनाचा त्रास होतोय? बॉडीला असे करा डिटॉक्स

Acidity Problem : गोडाचे आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते, पोट भरलेले राहते आणि सतत मळमळ वाटते. यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटते.

कोमल दामुद्रे

Acidity Relief Drink :

होळीच्या सणात आपण अधिक गोडाचे आणि तेलकट पदार्थ खातो. पदार्थ इतके चविष्ट असतात की, तो खाण्याचा मोह आपल्याला काही आवरता येत नाही. जास्त प्रमाणात याचे सेवन केल्याने आरोग्याला नुकसान होते.

गोडाचे आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते, पोट (Stomach) भरलेले राहते आणि सतत मळमळ वाटते. यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटते. चक्कर किंवा घाम येतो, डिहायड्रेशनसारखे होते. जर तुम्हालाही असा त्रास होत असेल तर बॉडीला डिटॉक्स करण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा.

1. बॉडी डिटॉक्स करण्याची पद्धत

  • होळीच्या (Holi Festival) पार्टीमध्ये दारु, भांगचे सेवन केले असेल तर पुढील १५ ते २० दिवस याचे सेवन करु नका.

  • शरीर डिटॉक्स करण्यासाठी भरपूर पाणी (Water) प्या, लघवीवाटे विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होईल.

  • शरीर डिटॉक्स करण्यासाठी ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घ्या.

  • आपल्या आहारात जंक आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा. तसेच काही दिवस तळलेले आणि गोडाचे पदार्थ खाऊ नका.

  • आहारात फायबर आणि अँटिऑक्सिडंटयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवा.

  • जेवणात हिरव्या भाज्या आणि फळे यांचा समावेश करा. तसेच सूप किंवा रस पिऊ शकता.

  • पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी प्रोबायोटिक्सचे प्रमाण वाढवा. यामध्ये दही, टोमॅटो, केळी , कांदा आणि लसणाचा समावेश करा

  • आहारात मीठाचे प्रमाण कमी करा. योग किंवा व्यायाम करा. यामुळे शरीर डिटॉक्सिफाय होण्यास मदत होते.

  • सकाळी रिकाम्या पोटी लिंबू-मधाचे पाणी प्या. ज्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर पडण्यास मदत होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : 'एक मैं और एक तू... ', जेव्हा अमित ठाकरे गाणं गातात | Marathi News

IND vs AUS, Playing XI: रोहितचा पर्याय सापडला! पर्थ कसोटीसाठी टीम इंडिया या 11 खेळाडूंसह उतरणार मैदानात

Nashik News : मोठी बातमी! नाशिकमध्ये ५ कोटींचं घबाड सापडलं, नेत्यासह गाडीही ताब्यात

Maharashtra News Live Updates: पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Night Skin Care: झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा किचनमधील 'या' गोष्टी; सकाळी मोत्याप्रमाणे चमकेल चेहरा

SCROLL FOR NEXT