High Cholesterol Symptoms  google
लाईफस्टाईल

High Cholesterol Symptoms: सावधान! थंडीत ही 5 लक्षणे अजिबात दुर्लक्षित करु नका, असू शकतो उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका

Cholesterol Symptoms: थंडीत दिसणारी काही लक्षणे उच्च LDL कोलेस्टेरॉलचा धोका दर्शवू शकतात. वेळेत ओळख आणि तपासणी केल्यास हृदयविकार व स्ट्रोक टाळता येऊ शकतो.

Sakshi Sunil Jadhav

बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना कमी वयातच गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. कामाचा ताण, वाढतं वजन, चुकीचा आहार आणि कमी झोप या सामान्य वाटणाऱ्या समस्यांना आपण दुर्लक्षित करत असतो. पण याने भविष्यात होणाऱ्या आजारांचा आपण विचारच करत नाही. कारण चुकीच्या आहारामुळे किंवा सवयींमुळे तुमच्या शरीरात काही हानिकारक द्रवांचा साठा होतो आणि तुम्हाला याची कल्पनाही नसते. काही वेळेस लोक थंडीत होणारे बदल म्हणूनही याकडे दुर्लक्ष करतात. पण हे अत्यंत घातक ठरु शकतं.

काही लक्षणांची अनेकांना कल्पनाच नसते. त्यातला एक आजार म्हणजे खराब कोलेस्ट्रेरॉल आहे. त्यातली उच्च LDL म्हणजे खराब कोलेस्ट्रॉलचा ही एक शांतपणे वाढणारी समस्या आहे. या समस्येवर वेळीच उपचार केले नाही, तर हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक सारख्या समस्यांचा धोका वाढतो. पण याची लक्षण कशी ओळखायची? कोणत्या समस्यांना दुर्लक्ष करायचं नाही? हे आपण पुढील माहितीत जाणून घेणार आहोत.

१. छातीत दुखणे किंवा अस्वस्थता जावणवणे.

हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या किंवा धमन्या अरुंद झाल्याने छातीत दुखतं, श्वास घेताना जड वाटतं. शारीरिक मेहनतीचं काम करताना हा त्रास वाढतो. हे हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होत असल्याचे संकेत असतात.

२. श्वास घेताना त्रास होणे.

थोड्या हालचालींनंतर किंवा काही काम न करता, झोपेतून उठल्यावर दम लागणं हे गंभीर लक्षणअसू शकतं. रक्तवाहिन्यांमधल्या अडथळ्यांमुळे शरीराला पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही. बरेच हाय LDL असल्याने हा त्रास वाढतो.

३. सतत थकवा आणि अशक्त वाटणे.

रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे स्नायू आणि अवयवांना आवश्यक ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे सतत थकवा, कमजोरी आणि अशक्तपणा जाणवतो. पुरेशी झोप घेतल्यानंतरही थकवा जाणवू शकतो.

४. हात-पाय बधीर होणे किंवा थंड पडणे.

उच्च LDL मुळे हात-पायांमध्ये रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे ते सुन्न होतात, टोचल्यासारखे वाटतात किंवा थंडी जास्त प्रमाणात जाणवते. हे पेरिफेरल आर्टरी डिसीजचे संकेत असू शकतात.

५. त्वचेखाली पिवळसर गाठी येणे.

डोळ्यांच्या पापण्यांवर, कोपर, गुडघे किंवा हातांवर पिवळसर चरबीच्या गाठी दिसू शकतात. हे खूप जास्त कोलेस्टेरॉलचे बाह्य लक्षण मानले जाते. अशा वेळी तातडीने तपासणी करणे आवश्यक असते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अवकाळीचा पुणे शहराला तडाखा, १४ ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना

Karvanda Chutney Recipe: गावरान स्टाईल आंबट- गोड करवंदाची चटणी कशी बनवायची?

Weight Loss Recipe : चटपटीत 'इडली'ला बनवा हेल्दी, फक्त टाका 'हा' एक पदार्थ, झपाट्याने वजन होईल कमी

Explainer: लहान उद्योजकांसाठी खास टिप्स, हा नवा कसा गेम चेंजर ठरणार? वाचा सविस्तर

LPG Cylinders: गॅस सिलिंडरच्या नियमात पुन्हा बदल होणार, केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT