Shreya Maskar
पावसाळ्यात उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी स्वतःची विशेष काळजी घ्या. वेळेवर औषधे घ्या. पावसाळ्यात हाय बीपीची समस्या असलेल्या लोकांनी या गोष्टीची विशेष काळजी घ्या.
पावसाळ्यात हवामान थंड असल्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचित पावतात, ज्यामुळे हृदयावरील ताण वाढून हाय बीपीची समस्या उद्भवते.
प्रक्रिया केलेले, डबाबंद पदार्थ, लोणची आणि रस्त्यावरील खारट पदार्थ खाणे टाळा. जास्त मिठामुळे शरीरात पाणी साठते, रक्ताचे प्रमाण वाढते आणि रक्तदाब वाढतो.
पावसाळ्यात जिवाणू संसर्ग टाळण्यासाठी कच्चे सॅलड, न धुतलेल्या पालेभाज्या खाणे टाळा. जंक फूड आणि स्ट्रीट फूड तर खाऊच नका. ओट्स, ब्राऊन राईस आणि पोटॅशियमयुक्त भाज्या यांचे सेवन करा.
पावसाळ्यात घरी असो वा बाहेर उबदार कपडे घाला. पावसाळ्यात थंड वातावरणामुळे तुमच्या रक्तवाहिन्या वेगाने आकुंचन पावू शकतात, ज्यामुळे रक्तदाबात अचानक चढ-उतार होऊ शकतो.
जास्त आर्द्रतेमुळे श्वास घेणे कठीण होऊ शकते. अत्यंत दमटपणात घराबाहेर व्यायाम करणे टाळा. त्याऐवजी हृदय व रक्तवाहिन्यांवरील ताणाचा धोका कमी करण्यासाठी घरीच हलका व्यायाम करा. एरोबिक व्यायाम करा.
पावसाळ्यात थंड वातावरणामुळे आपण पाणी कमी पितो, ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. पण शरीराला उबदार आणि हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी, गरम हर्बल चहा, फळांचे ज्यूस आणि गरमागरम सूप प्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.