

हिवाळ्यात थंडीमुळे भूक वाढते, पण वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हलका आणि पचायला सोपा नाश्ता निवडणं महत्त्वाचं असतं. अशा वेळी मूग डाळ ढोकळा हा एक उत्तम आणि पौष्टिक पर्याय ठरू शकतो. भिजवलेल्या आणि वाटलेल्या मूग डाळीपासून तयार होणारा हा ढोकळा तळलेला नसतो. तर वाफवलेला असतो आणि त्याने कॅलरी कमी राहतात आणि तो खाल्यावर जड वाटत नाहीत.
मूग डाळ ढोकळ्यामध्ये भरपूर प्रमाणात वनस्पतीजन्य प्रथिने (Vegetable Protein)असतात. ही प्रथिनं पोट जास्त वेळ भरलेलं ठेवण्याचं काम करतात. त्यामुळे सतत भूक लागत नाही. थंडीत शरीराला हवी असणारी ऊर्जा मिळते. अशा वेळी प्रोटीनचा नाश्ता थंडीचा थकवा कमी करतो. कारण हा वाफवण्याच्या प्रक्रियेमुळे पोषक घटक सुरक्षित होतात आणि पचनसंस्थेवर ताण येत नाही.
ढोकळा हा आंबवलेला पदार्थ असल्यामुळे तो पचनासाठीही फायदेशीर ठरतो. थंडीच्या दिवसांत जड पदार्थांमुळे पोटदुखी किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी आंबवलेले पदार्थ पोषक तत्त्वांचे शोषण सुधारण्यास मदत करतात. मूग डाळीत असलेले नैसर्गिक फायबर आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळच्या हलक्या भुकेसाठी मूग डाळ ढोकळा खाता येतो. हिरव्या चटणीसोबत किंवा साधाच खाल्ला तरी तो चवदार लागतो. मऊ, सॉफ्ट चव आणि संतुलित पोषणमूल्यांमुळे हा पारंपरिक पदार्थ आजच्या आधुनिक लाइफस्टाइलमध्ये तितकाच फायदेशीर ठरतो.
हिवाळ्यात हलका, आंबवलेला आणि पोषणमूल्यांनी समृद्ध असा नाश्ता हवा असेल तर मूग डाळ ढोकळा हा उत्तम पर्याय मानला जातो. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांसाठी हा पदार्थ पोटभरणारा, पचायला सोपा आणि आरोग्यदायी ठरू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.