Indigestion problems: थंडीच्या दिवसात होतेय अपचनाची समस्या? स्वयंपाक घरात असलेला हा मसाला करेल त्रास दूर

kitchen spice remedy indigestion: थंडीच्या दिवसांत अनेकांना अपचन, पोट फुगणे, अॅसिडिटी यांसारख्या समस्या जाणवतात. यावर घरगुती उपाय म्हणून स्वयंपाकघरातील मसाले अत्यंत उपयुक्त ठरतात.
Indigestion problems
Indigestion problemsSAAM TV
Published On

भारतीयांच्या जेवणाची चव ही मसाल्यांमुळे येते. स्वयंपकघरात असलेले हे मसाले केवळ भाजीची चव वाढवत नाहीत तर आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. भारतीय स्वयंपाकघरात अनेक प्रकारचे मसाले आढळतात. त्यापैकी एक महत्त्वाचा मसाला म्हणजे जीरं. आयुर्वेदात औषधी गुणांनी परिपूर्ण जीरं हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं.

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या माहितीनुसार, स्वयंपाकघरात ठेवलेलं जीरे केवळ अन्नाची चव वाढवत नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतं. गेल्या बऱ्याच काळापासून आयुर्वेदात याचा वापर विविध आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातोय.

जीऱ्याचे पोषक घटक

जीऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात. यात एक-दोन नव्हे तर अनेक औषधी गुणधर्म आहेत. जीरं पचनसंस्थेला मजबूत करण्यास मदत करतं. पोटातील गॅस, अपचन, भूक न लागणं आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दूर करून आराम देते.

Indigestion problems
Liver Cancer Symptoms: लिव्हर कॅन्सर असणाऱ्यांना जाणवतात 'ही' प्रमुख लक्षणं; वेळीच सावध व्हा, नाहीतर...

पचनसंस्था

जीऱ्याचे पाणी पचनसंस्थेला मजबूत कऱण्यास मदत करतं. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. जीरं मेटाबॉलिझम वाढवतं. त्याचप्रमाणे चरबी कमी करण्यास मदत करतं. त्याचप्रमाणे खोकला-सर्दीमध्ये आराम देतं. भाजलेलं जीरं आणि गूळ एकत्र खाल्ल्यास घसा स्वच्छ होतो आणि खोकल्यात आराम मिळतो.

मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त

जीरं हे महिलांसाठी विशेष महत्त्वाचं मानलं जातं. मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी जीऱ्याचं पाणी अत्यंत उपयुक्त ठरतं. जीरं चावून खाल्ल्यास श्वासाची दुर्गंधी दूर होते आणि दात मजबूत राहतात. त्याचप्रमाणे हे अ‍ॅनिमिया दूर करण्यासही प्रभावी मानलं जातं. जीऱ्यातील जास्त प्रमाणातील लोहामुळे रक्ताची कमतरता भरून निघते.

Indigestion problems
Liver cancer: ही लक्षणं दिसली तर समजा लिव्हर लवकरच खराब होणारे; दुर्लक्ष केल्यास कॅन्सरही होऊ शकतो

पाण्यासोबत करा सेवन

भारतातील प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात असलेला हा छोटासा मसाला जीरं प्रत्यक्षात एक औषध आहे. दररोज एक चमचा भाजलेलं जीरं किंवा जीऱ्याचं पाणी प्यायल्याने अनेक लहान-मोठ्या समस्या दूर राहतात. मात्र, सेवन करण्यापूर्वी आयुर्वेदाचार्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

Indigestion problems
Hysterectomy effects: महिलांच्या शरीरातून गर्भाशय काढल्यानंतर कोणते बदल होतात? यामागे कोणती कारणं असतात?

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com