Cholesterol signs on face SAAM TV
लाईफस्टाईल

Cholesterol signs on face: तुमच्या त्वचेमध्ये हे बदल दिसले तर समजा कोलेस्ट्रॉल वाढलंय; 8 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

High cholesterol symptoms: कोलेस्ट्रॉल वाढल्यास त्याची लक्षणं चेहऱ्यावर दिसू शकतात. डोळ्यांभोवती पिवळे डाग, सूज किंवा त्वचेतील बदल यांसारख्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. वेळेत ओळखून उपचार करणं आवश्यक आहे.

Surabhi Jayashree Jagdish

कामाचा ताण आणि वेळा यामुळे अनेकदा आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. अशावेळी शरीर देत असलेल्या संकेतांकडे देखील आपण दुर्लक्ष करतो. चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होण्याचा धोका वाढतो. अशावेळी शरीर आपल्याला काही ना काही इशारे देत असतं मात्र आपण त्याकडे गंभीरतेने लक्ष देत नाही.

मुळात कोलेस्ट्रॉल हे शरीरासाठी आवश्यक असलेलं चरबीसारखं द्रव्य असतं. पण त्याचं प्रमाण जास्त झाल्यास ते रक्तवाहिन्यांमध्ये साठू लागते. जर आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त झालं तर हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकसारख्या गंभीर समस्यांचा धोका वाढतो. दिल्लीतील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अरुष मेहरा यांनी कोलेस्ट्रॉलची लक्षणं सांगितली आहेत.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं की त्याची लक्षणं तुमच्या त्वचेवर दिसून येतात. ही लक्षणं वेळेत ओळखली तर त्यावर उपचार करणं सोपं जातं. ही लक्षणं काय आहे ती पाहूयात.

डोळ्यांच्या आसपास पिवळसर डाग

डोळ्यांच्या कोपऱ्याजवळ किंवा पापण्यांवर पिवळसर, मऊ थर दिसले तर ते हे कोलेस्ट्रॉल वाढल्याचे संकेत असतात. हे बहुतेक वेळा LDL वाढल्यामुळे होतं.

पापण्यांवर लहान चरबीच्या गाठी

यावेली पापण्यांवर लहान गाठी किंवा चरबीचे छोट्या गाठी दिसून येतात. हेही ट्रायग्लिसराइड्स किंवा कोलेस्ट्रॉल जास्त असल्याचं संकेत देतात.

डोळ्याभोवती सर्कल येणं

कॉर्नियाभोवती पांढऱ्या किंवा राखाडी रंगाची पातळ सर्कल दिसणं हे सामान्यतः वयोमानानुसार दिसून येतं. मात्र तरुणांमध्ये असं दिसल्यास ते कोलेस्ट्रॉल वाढल्याचं लक्षण असू शकतं. अशावेळी तातडीने डॉक्टरांची मदत घेणं फायदेशीर ठरतं.

पापण्यांची सतत सूज

जर डोळ्यांभोवती सूज कायम राहत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अनेकदा ती सूज झोपेअभावी किंवा अॅलर्जीमुळे नसून ती शरीरात चरबी साठल्याचे संकेत असू शकतात.

त्वचेवर पिवळसर रेषा

चेहऱ्यावर, विशेषतः गाल आणि कपाळावर, पिवळसरपणा दिसणं हे शरीरात चरबी वाढल्याचं एक लक्षण मानलं जातं. अनेकदा तुमच्या चेहऱ्यावर पिवळ्या रेषा देखील दिसून येतात.

नाक किंवा डोळ्यांभोवती जाड त्वचा

तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यावर तुमच्या नाकाच्या किंवा डोळ्यांच्या आसपास त्वचा जाड होऊ लागते. इतकंच नाही तर नाकाभोवतती मेणासारखा थरही दिसून येतो.

वारंवार पिंपल्स येणं

सामान्यपणे आपल्याला येणारे पिंपल्स हे वेगळे असतात. पण सतत येणारे आणि लवकर न जाणारे पिंपल्स हे शरीरातील लिपिड मेटाबोलिझम बिघडल्याचं संकेत असू शकतात. याचा अर्थ तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं आहे.

चेहऱ्यावर गाठी किंवा पुरळ

चेहऱ्यावर वारंवार गाठी किंवा पुरळ येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे झॅन्थोमा किंवा इतर लिपिड समस्यांचं लक्षण असू शकतं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गर्भलिंगनिदान प्रकरणात चाकणकरांचं नाव अन् भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन उघड; खरात फाईल्समध्ये आला नवा ट्विस्ट

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील पाणीटंचाईवरून मंत्र्यासमोरच महिलांनी प्रशासनाला धरले धारेवर

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

SCROLL FOR NEXT