High Cholesterol Food Saam tv
लाईफस्टाईल

High Cholesterol Food : हाय कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाचे आरोग्य धोक्यात ! या आयुर्वेदिक उपायांनी करता येईल मात

Ayurvedic Tips For High Cholesterol : बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या मेंदूच्या समस्या, मधुमेह, कोलेस्ट्रॉलचा आजार हा सतत वाढत आहे.

कोमल दामुद्रे

How To Reduce High Cholesterol : उच्च कोलेस्ट्रॉल हे आरोग्यासाठी अधिक घातक आहे. बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या मेंदूच्या समस्या, मधुमेह, कोलेस्ट्रॉलचा आजार हा सतत वाढत आहे. वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे तरुणवर्ग चिंतेत आहे.

कोलेस्टेरॉलच्या उच्च पातळीमुळे हृदयविकाराचा झटका आणि इतर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका वाढू शकतो. आजकाल वाईट खाण्याच्या सवयी, बदलती जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, ज्यामुळे शरीराच्या अनेक अंतर्गत कार्यांवर परिणाम होतो.

अशा परिस्थितीत कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपचार आहेत ज्याच्यावर आपण मात करु शकतो. जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर या आयुर्वेदिक खाद्यपदार्थांच्या मदतीने तुम्ही तुमचे कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रित करून तुमचे हृदय निरोगी करू शकता.

1. लसूण

लसणात (Garlic) शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे. ज्याच्या मदतीने ते खराब कोलेस्टेरॉल दोन्ही कमी करते. जर लसूण कच्चा किंवा शिजवलेल्या पदार्थात खाल्ल्याने फायदा होईल.

2. आवळा

आवळ्यामध्ये (Amla) अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते. यामध्ये असणारे घटक हे कोलेस्ट्रॉलवर मात करण्यासाठी प्रभावी ठरतात. यासाठी सुकवलेला आवळा, मुरंबा किंवा याचे लोणचे आपण खाऊ शकतो.

3. त्रिफळा

त्रिफळा हे तीन फळांचे मिश्रण आहे-आमलकी, बिभिटकी आणि हरितकी, ज्याचा उपयोग आयुर्वेदिक औषधांमध्ये शरीर शुद्ध करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी केला जातो. हे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरते.

4. ग्रीन टी

ग्रीन टी अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते. तुम्ही ग्रीन टी गरम किंवा थंड पिऊ शकता.

5. धणे

धण्यात असणारे फायबर हे शरीरासाठी चांगला स्त्रोत मानले जाते, ज्याच्या मदतीने आपण कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करु शकतो. त्यासाठी जर आपण नियमितपणे धणे किंवा कोथिंबीरचे सेवन केल्यास फायदा होईल.

6. मेथी दाणे

मेथीचे दाणे (Fenugreek) देखील विरघळणाऱ्या फायबरचा आणखी एक चांगला स्त्रोत आहे आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास देखील उपयुक्त आहे. तुम्ही तुमच्या जेवणात मेथीचे दाणे टाकू शकता किंवा त्यांचा चहा बनवू पिऊ शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijaya Divas: 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठीत, आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार'; उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

Raj thackeray: आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #$@डू आहोत असा गैरसमज नको, राज ठाकरे कडाडले

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

SCROLL FOR NEXT