Blood Pressure Risks google
लाईफस्टाईल

Blood Pressure Risks: BP च्या लक्षणांना दुर्लक्ष करणं पडेल महागात; निकामी किडनी, हार्ट अटॅक आणि स्मरणशक्ती जाण्याचा वाढेल धोका

Kidney Damage Due To High BP: उच्च रक्तदाबाची सुरुवातीची लक्षणे दुर्लक्षित केल्यास हृदयविकार, स्ट्रोक, किडनी निकामी होणे आणि स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका वाढतो. तीसाव्या वर्षी नियमित रक्तदाब तपासणी अत्यावश्यक आहे.

Sakshi Sunil Jadhav

ऋतूत जसे बदल होतात तसेच बदल आजारात होत असतात. लहानपणाची दुखणी किंवा आजार वेगळे असतात. तसेच मोठं झाल्यावर आणि वृद्ध झाल्यावर आजारात बदल होतात. त्यातला एक आजार म्हणजे ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाब. हा आजार बऱ्याच मंडळींना वेळेत ओळखता येत नाही. त्यामुळे त्याचे उपचार उशीरा होतात. त्याच दरम्यान तुमच्या ह्रदयावर, मेंदूवर, डोळ्यांवर आणि तुमच्या मूत्रपिंडावर गंभीर परिणाम होत असतात.

बऱ्याचदा वाढत्या उच्च रक्तदाबाचा परिणाम शरीरावर लगेच दिसत नाही. व्यक्ती एकदम ठणठणीत दिसते. पण त्याच्या शरीरातले अवयव व्यवस्थित काम करत नसतात. कधीकधी त्यांच्यावर जास्त ताण येतो आणि त्याचा वेगळा त्रास सुरु होतो. त्यामुळे वेळीच उपचार केले पाहिजेत, असे तज्ज्ञ सांगतात. पुढे आपण याचीच एकदम सुरुवातीची लक्षणे कोणती , ती कधी सुरु होतात? याबद्दल जाणून घेणार आहोत.

सुरुवातीला रुग्णाला डोकं दुखणं, थकवा, ह्रदयाच्या ठोक्यात बदल ही खूप सामान्य लक्षणं जाणवतात. बऱ्याचदा ती धावपळीमुळे वाढलेली वाटतात. त्यामुळे लोक त्यांना लगेचच दुर्लक्षित करतात. त्यामुळे तुम्ही वयाच्या तिशीतच उच्च रक्तदाबाची चाचणी करणे गरजेचे आहे.

कधीकधी हाय ब्लड प्रेशरमुळे ह्रदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त जोर लावावा लागतो. त्याने ह्रदयाचे स्नायू जाड आणि मोठे होऊ शकतात. जर ताण तसाच कायम राहीला तर तुमचं ह्रदय कमकुवत होऊ शकतं. याने तुम्हाला कमी वयातच ह्रदयविकाराच्या धोक्याला म्हणजेच हार्ट अटॅकला सामोरं जावं लागतं. त्याचा मेंदुवर होणारा परिणाम म्हणजे, तुमच्या मेंदुकडे रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या हळूहळू कमकुवत होतात. त्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. त्याने तुमची स्मरणशक्ती तुम्ही तिशीतच गमावू शकता.

किडनीवर होणारा परिणाम म्हणजे, उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडातील सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे नुकसान होतं आणि काहीदिवसांनी मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता वाढते. डोळ्यांच्या रेटिनातील नाजूक रक्तवाहिन्यांवरही ताण येतो, त्यामुळे दृष्टी कमी होऊ शकते, नुकसान होऊ शकतं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT