Hemoglobin Deficiency, How To Increase Hemoglobin Saam Tv
लाईफस्टाईल

Hemoglobin Deficiency : शरीरात रक्ताची कमतरता जाणवतेय? डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश

How To Increase Hemoglobin : आपल्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर शरीरात अशक्तपणा येतो. ज्यामुळे अनेक आजारांना आपण बळी पडतो. शरीरात लाल रक्तपेशींची कमतरता होते तेव्हा हिमोग्लोबिनची पातळी कमी होते.

कोमल दामुद्रे

Hemoglobin Deficiency Causes :

बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेकदा आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. यामुळे शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे अनेकदा थकवा, अशक्तपणा आणि चक्कर येण्याची समस्या जाणवू शकते.

आपल्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर शरीरात अशक्तपणा येतो. ज्यामुळे अनेक आजारांना (Disease) आपण बळी पडतो. शरीरात लाल रक्तपेशींची कमतरता होते तेव्हा हिमोग्लोबिनची पातळी कमी होते.

लोह शरीरात हिमोग्लोबिन तयार करते. लाल रक्तपेशींमध्ये आढळणारा पदार्थ हा आपल्या शरीरात ऑक्सिजन पोहोचवते. कमी हिमोग्लोबिनमुळे अॅनिमियासारख्या आजारांना बळी पडतात. अॅनिमियामुळे शरीरात कोणती लक्षणे दिसतात. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात (Diet) कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे हे जाणून घेऊया

1. रक्ताच्या कमतरतेमुळे कोणती लक्षणे दिसतात?

  • अशक्त वाटणे

  • चक्कर येणे

  • वाढलेली हृदयाची गती

  • चेहरा निर्जीव होणे

  • नखे कमकुवत होणे

  • केसगळती

2. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काय खावे?

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी लोहयुक्त पदार्थांचे सेवन करावे. बीटरुट, गाजर आणि खजूर यांचा आहारात समावेश करा. याचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण झपाट्याने वाढते. रोज बीटरुट खाल्ल्याने तुमच्या शरीरातील रक्त वाढते. शरीरात रक्त वाढवण्यासाठी आहारात गाजरचा समावेश करा. यामुळे नियमित सेवन केल्याने लोहाची पातळी वाढवण्यास मदत होते. पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स वाढवण्यातही गाजर खूप प्रभावी आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि आयर्न मुबलक प्रमाणात आढळते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

SCROLL FOR NEXT