High Cholesterol कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल दही, या पद्धतीने आहारात करा वापर

Cholesterol Disease : बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, अपुरी झोप आणि अधिकचा मानसिक ताण यामुळे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. यामुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढते.
High Cholesterol, Cholesterol Disease
High Cholesterol, Cholesterol DiseaseSaam Tv
Published On

Curd Good For Cholesterol :

बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, अपुरी झोप आणि अधिकचा मानसिक ताण यामुळे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. यामुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढते.

सध्या उच्च कोलेस्टेरॉलची समस्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. शरीरात चरबी जमा झाल्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि रक्त परिसंचरणावर परिणाम होतो. यामुळे लोकांना बीपीचा (BP) त्रास होतो आणि हृदयविकाराच्या झटक्याला (Heart Attack) सामोरे जावे लागते.

यासाठी आहारात (Food) कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करणारे पदार्थ खाणे आवश्यक आहे. असाच एक पदार्थ दही. दुधापासून बनवलेला हा पदार्थ कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. याचा आहारात कसा वापर करायचा जाणून घेऊया

High Cholesterol, Cholesterol Disease
High Cholesterol : भारतीय तरुणांमध्ये वाढतेय कोलेस्टेरॉलचे प्रमाण, या चुकीच्या सवयींमुळे गमवावा लागू शकतो जीव

NIH च्या अहवालानुसार दह्याचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. दह्यात असणारे व्हिटॅमिन सी, ट्रायग्लिसराइड्स, ग्लुकोज, इन्सुलिन हे रक्तदाब कमी करण्यास मदत करते. हे चांगले कोलेस्टेरॉल वाढण्यास मदत करते.

दह्याची कोलेस्टेरॉल कमी करण्याची क्षमता त्याच्या प्रोबायोटिकवर अवलंबून असते. ब्रिटिश संशोधनात असे आढळून आले की, प्रोबायोटिक सेवनाने रक्तात तयार होणारे कोलेस्टेरॉल लिपोप्रोटीनची पातळी कमी करते. ज्यामुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास मदत करते.

High Cholesterol, Cholesterol Disease
Diabetes Tips : मधुमेहाच्या रुग्णांनी हे ५ पदार्थ खायलाच हवे, रक्तातील साखर राहिल नियंत्रणात

1. कोलेस्टेरॉल अधिक असल्यास दही कसे खावे?

कोलेस्टेरॉल जास्त असल्यास दही खाण्याचा उत्तम उपाय म्हणजे दह्यात थोडेसे काळे मीठ टाकून जेवणानंतर खाणे. दिवसभरात किमान वाटीभर दही खा. यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच पचनासंबंधितच्या अनेक समस्या दूर होतील. दह्याचे सेवन केल्याने चयापचय गतिमान होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com