Weight Loss Tips Saam TV
लाईफस्टाईल

Weight Loss Tips : पोट सुटलंय अन् मांड्या एकमेकांना घासल्या जातात? घरच्याघरी करा आराम देणारा रमबाण उपाय

Weight Loss Diet : अनेक महिला आणि पुरुषांना देखील वजन वाढल्याने मांड्या एकमेकांवर घासल्या जाणाच्या समस्या जाणवतात. चालताना फार त्रास होतो, यावर आम्ही रामबाण उपाय शोधला आहे.

साम टिव्ही ब्युरो

रोजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे शरीराची जास्त हालचाल होत नाही. त्यामुळे कमी आहार असला तरी लगेचच वजन वाढतं. वजन वाढल्यानंतर आपल्याला विविध आजार जडू शकतात. तसेच त्वचेसंबंधीत देखील अनेक समस्या निर्माण होतात. अनेक महिला आणि पुरुषांना देखील वजन वाढल्याने मांड्या एकमेकांवर घासल्या जाण्याच्या समस्या असतात. या समस्यांवर आम्ही रामबाण उपाय शोधला आहे.

पावडर किंवा सॉफ्ट क्रिम

जेव्हा जेव्हा असा त्रास जाणवेल तेव्हा घासलेल्या भागावर सॉफ्ट क्रिम किंवा पावडर अप्लाय करा. ओले कपडे वापरू नका. ओले कपडे घातल्याने हा त्रास आणखी वाढतो आणि काही दिवसांनी तुम्हाला फंगल होऊ शकते.

सब्जा सूप

उन्हाळ्यात लठ्ठ व्यक्तींना या त्रासापासून सुटका हवी असेल तर आधी वजन कमी करा. वजन कमी करण्यासाठी तुम्ही सब्जा सूपचे सेवन करू शकता. एखादं भाज्यांचं सूप बनवल्यावर त्यामध्ये सब्जा टाकून प्या. सब्जा असा पदार्थ ज्याने शरीरावरील चर्बी कमी करण्यास मदत होते. त्यामुळे याचे सेवन करा.

हेल्दी ड्रींक

जाड व्यक्तींना सतत भूक लागते ते सतत काही ना काही खात असतात. सतत खाल्ल्याने आणि व्यायाम न केल्याने वजन आणखी वाढते. त्यामुळे भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही हेल्दी ड्रींक पिण्यास सुरुवात करा. यामध्ये पपयी, अननस किंवा अन्य फळांचा ज्यूसचे सेवन तुम्ही करू शकता.

चणे पावडर ज्यूस

एक वाटी भाजलेले काळे चणे घ्या. त्यावर असलेली साल काढून टाका. त्यानंतर मिक्सरमध्ये याची बारीक पेस्ट बनवून घ्या. रोज सकाळी दूधात ही पावडर प्यायल्यानंतर तु्म्हाला दुपारपर्यंत अजिबात भूक लागणार नाही.

तेलकट आणि गोड खाणे बंद करा

वजन कमी करण्यासाठी गोड पदार्थ फार घातक आहे. कारण गोड पदार्थांमुळे शरिरात जास्त प्रमाणात कॅलरीज वाढतात. त्यामुळे वजन कमी करणाऱ्या व्यक्तींनी गोड आणि तेलकट पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

व्यायाम करा

अनेक व्यक्तींना कामामुळे व्यायामासाठी वेळ मिळत नाही अशी तक्रार सांगतात. मात्र तुम्हाला कामासाठी अगदी १२ तास घराबाहेर राहावे लागत असले तरी व्यायाम करा. सकाळी उठल्यावर किंवा रात्री जेवणाआधी व्यायामासाठी वेळ काढा.

टीप: लठ्ठ व्यक्तींना येणाऱ्या अडचणींबाबत ही सामान्य माहिती आहे. विविध समस्यांसाठी तु्म्ही वैद्यकीय सल्ला घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भाजप प्रवेशानंतर कैलास गोरंट्याल यांचं जालन्यात पहिल्यांदाच आगमन; कार्यकर्त्यांकडून स्वागत

PF Rules Payslip : कंपनीच्या पे स्लिपमध्ये PF रक्कम कमी का दिसते? यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

Yashasvi Jaiswal : यशस्वी भव! ओव्हलच्या मैदानात जैस्वाल शो, इंग्लंडच्या नाकावर टिचून ठोकलं शतक

Maharashtra Politics : काँग्रेसला राज्यात मोठा झटका! बड्या नेत्याचा उपमुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Beed News: शाळा बनली कुस्तीचा आखाडा; शिक्षक आणि क्लर्कमध्ये हाणामारी पाहा,VIDEO

SCROLL FOR NEXT