Heart Attack Prevention google
लाईफस्टाईल

Heart Attack: झोपताना जबडा दुखतोय? असू शकतं हार्ट अटॅकचं लक्षण; वेळीच व्हा सावध नाहीतर..

Lifestyle Disease Risks: हार्ट अटॅकची लक्षणे नेहमी छातीत दुखण्यापुरती नसतात. थकवा, धडधड, मळमळ यांसारख्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका.

Sakshi Sunil Jadhav

हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक ही सगळ्यात गंभीर आणि जीवघेणी समस्या असते. ही समस्या किंवा हा जीवघेणा आजार आता ३० वर्षांपासून ते वृद्धांपर्यंत झपाट्याने वाढताना दिसतोय. अर्थात याचे कारण तुमची बदललेली जीवनशैली आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याच समस्यांना दुर्लक्षित करु नका. शरीराशी संबंधित समस्या दुर्लक्षित केल्याने तुम्हाला नकळत जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागतो. त्यात हार्ट अटॅकचा धोका सगळ्यात जास्त असतो.

तज्ज्ञांच्या मते तुम्हाला तुमच्या जीवनशैली हलक्या आणि सामान्य दुखण्यांकडे दुर्लक्ष करणं चांगलच महागात पडू शकतं. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे अनेकांच्या खाण्यापिण्याच्या वेळा बदलल्यात. इतकंच नाहीतर तर कामानिमित्त तासंतास घराबाहेर असतात, अशावेळेस नाश्त्यासाठी, कधीकधी जेवणासाठी लोक भरपूर पैसा खर्च करुन रेस्टॉरंट्समध्ये जातात. त्यामध्ये तळलेले पदार्थ, ऑयली पदार्थ, जंक फूड्स यासगळ्याचा समावेश होतो. यानेच तुम्हाला हार्ट अटॅकला सामोरं जावं लागतं.

हार्ट अटॅक म्हणजे हृदयाच्या स्नायूंना जाणारा रक्तप्रवाह अचानक थांबतो किंवा कमी होतो. हृदयाला ऑक्सिजन पोहोचवणाऱ्या कोरोनरी आर्टरीमध्ये रक्ताची गाठ जेव्हा तयार होते तेव्हा रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे कोणतंही वेगळं लक्षण किंवा शरीरात काही बदल होताना जाणवत असतील तर त्यावर उपचार घेणं खूप गरजेचं आहे. त्यात अनेकांचा समज आहे की, हार्ट अटॅक म्हणजे छातीत दुखणं. पण तज्ज्ञांच्या मते, छातीत दुखणं हे एकमेव लक्षण नाही.

अनेक वेळा हार्ट अटॅकची लक्षणे रात्री झोपेतही जाणवतात. विशेषतः महिलांना, अचानक खूप थकवा जाणवत असेल तर हे हार्ट अटॅकचं महत्त्वाचं लक्षण असू शकतं. कोणतंही जड काम न करता सुद्धा शरीर खूप थकल्यासारखं वाटत असेल, तर ते दुर्लक्षित करू नका. त्यासोबत हृदयाची धडधड अचानक वाढणं किंवा अनियमित होणं हे देखील धोक्याचं लक्षण ठरू शकतं.

काही रुग्णांना हार्ट अटॅकच्या वेळी मळमळ, उलटी सारखं वाटतं. काहींना डाव्या हातात, मानेत, पाठीमध्ये किंवा पोटातही वेदना होतात. तर काही वेळा जबड्यात वेदना जाणवतात. हे लक्षण फारसं ओळखलं जात नाही, पण छातीत दुखणं, धडधड किंवा थकवा यासोबत जबड्यात वेदना होत असतील, तर ते हार्ट अटॅकचं गंभीर लक्षण असू शकतं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Hair Remedies: पांढऱ्या केसांवर काय उपाय करायचा प्रश्न पडलाय? मग हे तेल आठवड्यातून २ वेळा वापरुन पाहा

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates: लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस 1 नंबरचा पक्ष; आमदार अमित देशमुखांकडून विजयी उमेदवारांना शुभेच्छा

Veg Tikki Recipe: संध्याकाळी नाश्त्याला खा 'व्हेज टिक्की', झटक्यात बनेल ही रेसिपी

परभणीत उद्धव ठाकरेंना धक्का; जिल्हा परिषदेवर भाजपने झेंडा फडकावला, तुमच्या गटातून कोण विजयी?

Maharashtra Live News Update: उद्या संध्याकाळी रोहित पवार यांची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT