Sakshi Sunil Jadhav
आपलं शरीर सुमारे 70 टक्के पाण्याने बनलेलं आहे. पाणी फक्त तहान भागवण्यासाठी नाही तर शरीरातील प्रत्येक अवयव सुरळीत काम करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
पाणी कमी पिल्याने तोंडातला ओलसरपणा कमी होतो. यामुळे बॅक्टेरिया वाढतात आणि तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. सतत दुर्गंधी जाणवत असेल तर पाणी पित राहा.
पाणी स्कॅल्प आणि केसांच्या मुळांना पोषण देतं. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास स्कॅल्प कोरडा होतो आणि केस कमकुवत होऊन जास्त प्रमाणात गळू लागतात.
पाणी कमी पिल्याने शरीरातील रक्ताभिसरण नीट होत नाही. यामुळे हिमोग्लोबिनची पातळी कमी होते आणि हळूहळू अॅनिमिया होण्याचा धोका वाढतो.
शरीरात पाणी कमी असल्यास एनर्जी लेव्हल कमी होते. त्यामुळे दिवसभर थकवा, सुस्ती आणि कमजोरी जाणवते.
पाण्याच्या कमतरतेचा थेट परिणाम मेंदूवर होतो. यामुळे डोकेदुखी, चिडचिड, मूड स्विंग्स, तणाव आणि अॅनझायटी वाढू शकते.
पाणी त्वचेतील पेशींना हायड्रेट ठेवते. पाणी कमी पिल्यास त्वचा रूक्ष, कोरडी आणि निस्तेज दिसते.
दीर्घकाळ पाणी कमी पिल्याने त्वचेवर लवकर सुरकुत्या दिसू लागतात आणि त्वचेची नैसर्गिक चमक कमी होते.
पाणी कमी असल्यास ओठ सतत कोरडे पडतात, तोंडात कोरडेपणा जाणवतो आणि बोलताना अडचण येऊ शकते.
शरीर हायड्रेट नसल्यास मेंदूची कार्यक्षमता कमी होते. यामुळे लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येतात आणि कामात चुका होऊ शकतात.