Sakshi Sunil Jadhav
सध्या सोशल मीडियावर अभिनेता विशाल आणि त्याची अर्धांगिनी अभिनेत्री अक्षया हे दोघेही व्हायरल होत आहे.
नुकताच त्यांचा साखरपुडा पार पडला. सुरुवातीला विशाल निकमने त्यांचे सुंदर फोटो पण अक्षयाचा चेहरा न दिसणारे फोटो टाकून चाहत्यांची उत्सुकता वाढवली.
अखेर त्याने त्याने माझी अर्धांगिनी म्हणत तिचा चेहरा दाखवला आणि सोशल मीडियावर चाहत्यांच्या शुभेच्छांना सुरुवात झाली.
नुकतेच अभिनेत्रीचे मेहेंदीचे आणि साखर पुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यांनाही भरभरुन लोकांनी शुभेच्छा देत कौतुक केलं.
अक्षया हिंदळकर ही अभिनेत्री सरस्वती, तुझ्या इश्काचा नाद खुळा अशा मालिकांमधून प्रसिद्ध झाली.
अभिनेता विशाल निकम हा बिग बॉसमराठीच्या तिसऱ्या सिझनचा विजेता होता. त्याचसोबत त्यानेही अनेक मालिका केल्या आहेत.
दोघांनीही या आधी एकत्र ऑनस्क्रीन मालिकेत काम केलं होतं त्या मालिकेचं नाव हे 'साता जल्माच्या गाठी' होतं.
नुकतेच त्यांनी ज्योतिबाच्या मंदीरात जाऊन दर्शन घेतले होते. त्यांचेहे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.