

रोहित कदम, साम टीव्ही
ऐन उन्हाळ्यात पडलेल्या अवकाळी पावसानं स्मार्ट सिटीचे पुरते तीनतेरा वाजले. मेघगर्जना, वादळी वाऱ्यांसह सुरू झालेल्या अवकाळीनं पुणेकरांची दाणादाण उडाली. शहरातील रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरुप आलं. अवघ्या काही तासांमध्ये एनडीए परिसरात 84 मिमी तर शिवाजीनगर परिसरात 65 मिमी पावसाची नोंद झाली.
मात्र, एवढया पावसात पुण्याची अशी पडझड का होते असा संतप्त सवाल पुणेकर विचारत आहेत.
मात्र ऐन पावसाळा दूर असतानाही फक्त अवकाळी पावसानेच पुण्याची एवढी दाणादाण का उडतेय.... पाहूयात...
नालेसफाईचा अभाव
कसंही विस्तारणाऱ्या पुण्यात छोटे-मोठे नाले आणि पावसाळी गटार कचऱ्यानं भरलेली...
सदोष पावसाळी गटारे
ज्या वेगान शहराचा विस्तार झाला, त्या तुलनेत पावसाळी गटारांची यंत्रणा विकसित नाही.
जुन्या भागातील गटारं कमी क्षमतेची
वाढत्या बांधकामांमुळे अनेक ओढ्यांवर अतिक्रमणे
ओढ्यांचे प्रवाह सिमेंटच्या नाल्यांमध्ये बंदिस्त केले
पुण्याच्या आसपास टेकड्यांवर झालेली अनधिकृत बांधकामं
रस्त्यांच झालेलं काँक्रिटीकरण
सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यामुळे पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढलंय... त्यामुळं हे पाणी थेट शहरात घुसतंय... त्यामुळे उशीरा जागं झालेल्या पालिकेनं ९ मीटरपेक्षा कमी रस्त्यांचे सिमेंट कांँक्रिटीकरण न करण्याचा निर्णय घेतलाय. या अवकाळी पावसानं स्थानिक प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय... त्यामुळे शहराचे उप-महापौर परशुराम वाडकर यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय.. तर महापालिकेनं मात्र जबाबदारीतून पळ काढण्याचा प्रयत्न केलाय..
अवकाळी पावसातच स्मार्ट सिटीची अशी अवस्था झाल्यानं पुणे महापालिकेच्या कारभाराचे दावे फेल गेलेत. अशातच आता येणाऱ्या पावसाळ्यातही अशीच स्थिती निर्माण झाल्यास स्मार्ट सिटीचा पुन्हा बोजवारा उडू नये हीच अपेक्षा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.