Summer heart attack symptoms google
लाईफस्टाईल

Heart Attack : थकवा, दम लागतो, चक्कर येते? उन्हाळ्यातील ‘ही’ लक्षणे दुर्लक्षित करू नका; हार्ट अटॅकचा असू शकतो धोका

Heart Attack Symptoms: उन्हाळ्यात दिसणारी थकवा, दम लागणे, चक्कर यांसारखी सामान्य लक्षणे दुर्लक्षित करू नका. ही हृदयाच्या गंभीर आजारांची सुरुवात असू शकतात, वेळेवर तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे.

Sakshi Sunil Jadhav

उन्हाळा वाढला की अनेक आजारपणं वाढायला लागतात. या दिवसांमध्ये घामामुळे प्रचंड चिडचिड होते. घराबाहेर निघताच कपडे घामाने ओले होतात. काहीवेळेस थोडं चाललं तरी उन्हात चक्कर येते, काहींना उन्हाळ्यात तहानच लागत नाही. त्याने आरोग्याला जास्त त्रास होतो. यासगळ्याचा परिणाम तुमच्या ह्रदयावर होत असतो.

डॉक्टर म्हणतात की, हार्टचं नुकसान किंवा त्याच्या संबंधित आजारांची लक्षणं ओळखणं कठीण असतं. ती सायलेंट किलरप्रमाणे काम करत असतात. सुरुवातीला याची लक्षणं फार सामान्य वाटतात. पण प्रत्यक्षात तुमच्या शरीराचं आतून नुकसान झालेलं असतं.

तज्ज्ञांच्या मते, छातीत दुखणं हेच हार्ट अटॅक किंवा त्यासंबंधित आजारांचे लक्षण नसते. यामध्ये अगदी हलकी कामे केल्यानंतर दम लागतो किंवा झोपताना श्वास घ्यायला त्रास होतो. हे हृदय नीट पंपिंग करत नसल्याची लक्षणे असू शकतात. काही लोक याला थकवा किंवा हवामानाचा परिणाम समजून दुर्लक्ष करतात.

तसेच कोणतंही स्पष्ट कारण नसताना सतत थकवा जाणवणं, चक्कर येणं किंवा कमजोरी वाटणं ही लक्षणं सुद्धा हृदयाच्या समस्यांशी संबंधित असू शकतात. काही लोकांमध्ये पाय, गुडघे किंवा पायाच्या तळव्यांना सूज येते. त्यामुळे रक्ताभिसरण नीट होत नाही. विशेषतः महिलांमध्ये जबड्यात, खांद्यात, हातात किंवा पाठीमध्ये वेदना होतात. ज्या हार्ट अटॅकशी संबंधित असतात, पण ती सामान्य सांधे दुखी समजून अनेक मंडळी दुर्लक्षित करतात.

उन्हाळ्यात थंड घाम येणे, मळमळ होणे किंवा उलट्यांसारखे वाटणे ही लक्षणे अनेकदा तुमच्या खाण्याशी संबंधित समस्या समजली जाते. पण तज्ज्ञांच्या मते, ही हार्ट अटॅक संबंधित सुरुवातीची चिन्हं असू शकतात. तसेच रात्री झोपताना वारंवार खोकला येणं किंवा झोप न लागणं यामुळे तुमच्या ह्रदयावर परिणाम होतो. त्यामुळे लहान वाटणारी ही लक्षणे भविष्यातील मोठ्या आजाराचे संकेत असू शकतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Bhondu: महाराष्ट्राला भोंदूबाबाचा विळखा, भूत उतरवण्याच्या नावाखाली मुंबईकरांना गंडा; पाहा VIDEO

संत महाराजाचा आशीर्वाद घ्यायल्या गेलेल्या भाजप आमदाराला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Sambhajinagar: 'संभाजीनगर महापालिकेत भुतांचा वावर', मंत्र्यांकडूनच अंधश्रद्धेला खतपाणी

Maharashtra Weather: महाराष्ट्र रेड झोनमध्ये! राज्यात उष्माघाताचे 3 बळी? ९ जिल्ह्यांना उष्णतेचा जास्त धोका

Fact Check : आधार कार्ड दाखवा, 3 लाख मिळवा? सरकारची नवी 'पीएम लोन स्कीम'? Video

SCROLL FOR NEXT