Heart Attack Risk for Children Saam Tv
लाईफस्टाईल

VIDEO: हेल्थ ड्रिंकमुळे लहान मुलांना हार्ट अटॅकचा धोका? FSSAIच्या नियमावलीतून समोर आली धक्कादायक माहिती

Children Energy Drink News : अलिकडच्या काळात आपली मुलं जास्तीत जास्त एनर्जेटीक व्हावीत, त्यांची बुद्धीमत्ता वाढावी यासाठी पालक वाट्टेल ते करायला तयार असतात. याचाच फायदा घेत ऑनलाईन साईट्सवरून हेल्थ ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक्सची विक्री वाढलीय. मात्र याच ड्रिंक्समुळे तुमच्या मुलांना हार्ट अटॅकही येऊ शकतो असा दावा केला जातोय.

Mayuresh Kadav

सध्याचं युग हे स्पर्धेचं आहे. या स्पर्धेत आपल्या मुलांनं कायम पुढे राहावं यासाठी आई-वडिल आग्रही असल्याचं दिसतात. मुलांची बुद्धीमता वाढावी, त्यांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी पालक कुणाच्याही सल्ल्याला बळी पडतात. हीच बाब हेरून ऑनलाईन कंपन्यांनी हेल्थ ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्सचा बाजार मांडलाय. मुलांची उंची वाढवण्यासाठी दूधातून दिल्या जाणाऱ्या पावडरची सर्रासपणे विक्री सुरू आहे.

मात्र या सगळ्या गोष्टी तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचा दावा सोशल मीडियातून केला जातोय. इतकच नाही तर हेल्थ ड्रिंकमुळे तुमच्या मुलांना हार्ट अटॅकही येऊ शकतो. मुलांच्या आरोग्याचा प्रश्न असल्यानं साम टीव्हीनं या दाव्यामागची सत्यता पडताळून पाहिली. हेल्थ ड्रिंक, एनर्जी ड्रिंकबाबत FSSAIची नियमावली काय सांगते हे पडताळून पाहिलं. तेव्हा काय धक्कादायक माहिती समोर आली.

काय सांगतात FSSAIचे नियम?

FSSAI अॅक्ट 2006 नुसार यादीत हेल्थ ड्रिंक हा शब्द नाही. हेल्थ ड्रिंक किंवा एनर्जी ड्रिंक असा कोणताही पदार्थ नाही. अशा ड्रिंक्सची हेल्थ किंवा एनर्जी ड्रिंक म्हणून विक्री अवैध आहे. हाय कॅफिन ड्रिंक्सची विक्री इतर ड्रिंक्सप्रमाणेच करण्यात यावी. दुधातून घेतल्या जाणाऱ्या उच्च कॅफिनच्या पदार्थांबाबत कंपनीची मालकी नमूद करणं बंधनकारक आहे.

याचाच अर्थ तुम्ही पित असलेल्या हेल्थ आणि एनर्जी ड्रिंकला त्या नावानं कोणतीही अधिकृत मान्यता नाही. याबाबत आरोग्यतज्ज्ञांकडून आम्ही अधिकची माहिती जाणून घेतली. याबाबत माहिती देताना आरोग्य तज्ज्ञांनीसांगितलं की, हेल्थ ड्रिंकच्या वाढत्या वापरामुळे लहान मुलांना आतड्याचे आजार होऊ शकतात. दररोज साखरयुक्त सोड्याच्या पदार्थांचे सेवन केले तर 18 ते 20 टक्क्यांनी हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.

कंपनीकडे ज्या शीतपेयांची एनर्जी ड्रिंक म्हणून विक्री केली जाते त्यात साखरेचं प्रमाण अधिक असतं. शिवाय कॅफिनमुळे रक्तदाब वाढू शकतो. कोणत्याही वयोगटातल्या हार्मोन्स लेव्हलवर हे ड्रिंक ताण आणू शकतं. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

त्यामुळे आमच्या पडताळणीत हेल्थ ड्रिंक किंवा एनर्जी ड्रिक मुलांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचं स्पष्ट झालं. तुम्ही देखील जागृक होणं गरजेचं आहे. कोणत्याही फसव्या जाहिरातींना बळी पडू नका. आपल्या मुलांच्या वाढीसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं द्या...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT