Heart Attack  Saam tv
लाईफस्टाईल

Heart Attack : तरुणांनो, काळजी घ्या! कमी वयात हृदयविकाराच्या झटक्यांमध्ये वाढ; डॉक्टरांनी दिला सल्ला

Heart Attack Symptoms : दिवसेंदिवस तरुणांमधील हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण एक चिंतेचा विषय ठरत आहे. पुर्वी प्रौढांमध्ये आढळून येणारी ही समस्या हल्ली वृद्ध तरुणांमध्ये अधिक प्रमाणात पहायला मिळते.

कोमल दामुद्रे

Heart Attack Increasing in Youngster :

दिवसेंदिवस तरुणांमधील हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण एक चिंतेचा विषय ठरत आहे. पुर्वी प्रौढांमध्ये आढळून येणारी ही समस्या हल्ली वृद्ध तरुणांमध्ये अधिक प्रमाणात पहायला मिळते. तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची संख्या वाढत आहे.

बदलती जीवनशैली हे या मागचे मुख्य कारण ठरत आहे . अनुवांशिक स्थिती आणि अंतर्निहित आरोग्य परिस्थितीकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. परेलमधील ग्लोबल हॉस्पिटल्सचे इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्टचे डॉ समीर व्ही पगड म्हणतात की, हृदयविकाराच्या (Heart Attack) सुरुवातीच्या काळात तणाव आणि मानसिक आरोग्य हे देखील महत्त्वाचे कारण ठरले आहे. यासंबंधीत गुंतागुंत कमी करण्यासाठी तरुण वयातच नियमित आरोग्य (Health) तपासणी करणे गरजेचे आहे. निरोगी सवयींचे पालन करणे महत्त्वाचे ठरत आहे.

1. हृदय विकाराच्या झटक्याची लक्षणे कोणती?

लक्षणांमध्ये (Symptoms) छातीत अस्वस्थता, दम लागणे आणि तीव्र थकवा यांचा समावेश असू शकतो. जबड्यासंबंधीत वेदना, पाठीच्या वरच्या बाजूस होणाऱ्या वेदना आणि मळमळ यांसारखी लक्षणे हृदयविकाराचा झटका दर्शवू शकतात. या सूक्ष्म संकेतांकडे दुर्लक्ष करु नका तसेच ही लक्षणे आढळताच त्वरित वैद्यकीय मदत घ्यायला विसरु नका.

जीवनशैलीतील घटक जसे की तणाव, आहाराच्या चुकीच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे तरुणांमधील हृदयविकाराचा धोका वाढला आहे. हृदय निरोगी राहण्याकरिता नियमितपणे व्यायाम आणि हृदयासाठी निरोगी आहाराचे सेवन करा. तरुणांमधील हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे ओळखण्यासाठी त्याविषयी जागरूकता महत्त्वाची आहे.

2. प्रतिबंध कसा कराल?

हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी नियमित शारीरिक हालचालींना प्राधान्य देणे आणि आठवड्यातून किमान पाच दिवस व्यायाम करणे गरजेचे आहे. चालणे, पोहणे किंवा सायकल चालवणे यासारख्या विविध प्रकारच्या एरोबिक क्रियांचा समावेश केल्याने केवळ हृदयाचे स्नायू मजबूत होत नाहीत तर वजन देखील नियंत्रित राखण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते.

निरोगी हृदयासाठी फळे, भाज्या, तृणधान्य आणि प्रथिनयुक्त आहार स्वीकारणे आवश्यक आहे. अँटिऑक्सिडंट्स आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असलेल्या अन्नाचे सेवन केल्याने जळजळ कमी होण्यास मदत होते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांपासून संरक्षण होते. ध्यान किंवा योगसाधना हे तणावाचे व्यवस्थापन करण्यास मदत करतात. हे लक्षात ठेवा की तणाव हे हृदयाच्या समस्यांच्या विकासास कारणीभूत ठरते. म्हणून तणावाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभेसह लोकसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT