Heart Attack Emergency Tips google
लाईफस्टाईल

Heart Attack: घरी एकटं असताना हार्ट अटॅक आला तर...! १५ सेकंदांत करा हे तातडीचे उपाय

What to do during heart attack: घरात एकट्याला हार्ट अटॅक आल्यास घाबरू नका. दीर्घ श्वास घेणं, जोरात खोकणं, अ‍ॅस्पिरिन चावून घेणं आणि तात्काळ आपत्कालीन सेवांना कॉल करणं यामुळे जीव वाचवता येतो.

Surabhi Jayashree Jagdish

घरी एकट्याला हार्ट अटॅक येणं हे अत्यंत धोकादायक मानलं जातं. अशावेळी आपल्या मदतीला कोणी नाही यामुळे त्या व्यक्तीला अजूनच भीती वाटू लागते. मात्र डॉक्टर सांगतात की, हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं वेळेत ओळखून काही सेकंदांत योग्य पावलं उचलली, तर जीव वाचू शकतो. म्हणूनच अशा वेळी काय केलं पाहिजे हे माहिती असायला हवं.

दीर्घ श्वास घ्या

तज्ज्ञांच्या मते, शक्य तितक्या दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे फुफ्फुसांमध्ये अधिक प्रमाणात ऑक्सिजन पोहोचतो. अशा प्रसंगी तो शरीराला गरजेचा असतो. जॉन हॉपकिन्स यांच्या माहितीनुसार, अॅम्ब्युलन्स येईपर्यंत दीर्घ श्वास घेणं उपयोगी ठरतं. यामुळे मन शांत राहतं आणि शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा कायम राहतो.

जोरात खोकण्याचा प्रयत्न करा

डॉक्टर सांगतात की, दर दोन सेकंदांनी जोरात खोका. छातीत साचलेला कफ बाहेर काढण्यासाठी आपण कसे खोकतो, त्याप्रमाणे खोका. खोकल्यामुळे छातीच्या आतील भागात दाब निर्माण होतो आणि काही प्रमाणात रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.

शिकागो मेडिसिनच्या माहितीनुसार, खोकताना छातीतील दाबात (intrathoracic pressure) बदल होतो. हा बदल हृदयाकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहावर परिणाम करतो आणि मेंदूशी जोडलेल्या नर्व्ह सिस्टीमवर परिणाम करतो. या प्रक्रियेमुळे काही वेळा रक्तप्रवाह आणि electrical system मध्ये छोटे बदल होऊन अनियमित ठोके थांबण्यास मदत होऊ शकते.

आपत्कालीन सेवांना फोन करा

जर तुम्ही हार्ट पेशंट असाल तर आपत्कालीन सेवांचा नंबर जवळ ठेवा आणि लगेच कॉल करा. मात्र अशावेळी स्वतः वाहन चालवत रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न करू नका. फोन स्पीकरवर ठेवा जेणेकरून तुम्हाला समोरून दिल्या जाणाऱ्या सूचना ऐकून त्याप्रमाणे कृती करता येईल.

अ‍ॅस्पिरिन चावून घ्या

डॉक्टरांचा सल्ला असा आहे की, जर तुम्हाला अ‍ॅस्पिरिनची अ‍ॅलर्जी नसेल तर साधारण ३२५ मिग्रॅची एक अ‍ॅस्पिरिन गोळी चावा. ती पूर्ण गिळू नका. अ‍ॅस्पिरिनमुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची प्रक्रिया मंदावते.

गोळी चावल्यामुळे ती लवकर रक्तप्रवाहात मिसळते आणि गुठळ्या वाढण्यापासून रोखण्यास मदत होते. मात्र जर तुम्हाला अ‍ॅस्पिरिनची अ‍ॅलर्जी असेल किंवा डॉक्टरांनी आधीच अ‍ॅस्पिरिन घेऊ नका असं सांगितलं असेल, तर हा उपाय करू नका.

कोणाला हार्ट अटॅकचा येण्याचा धोका जास्त असतो?

  • उच्च रक्तदाब

  • मधुमेह

  • उच्च कोलेस्टेरॉल

  • धूम्रपानाची सवय

  • लठ्ठपणा

  • कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास

  • दीर्घकाळ ताणतणाव

या घटकांवर नियंत्रण ठेवल्यास हार्ट अटॅकचा धोका कमी करता येतो. त्यामुळे आपत्कालीन पावलं माहिती असणं जितकं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Price: मुंबईत पेट्रोल ५ रुपये स्वस्त दराने मिळणार; मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

अंबाबाईला अडीच कोटींचा सोन्याचा कळस, दीड किलो सोन्याचा कळस अंबाबाईच्या चरणी

Zp Scam: जिल्हा परिषदेत बोगस बिलांचा घोटाळा, CEOच्या बंगल्याला 25 लाखांची लाईटिंग

तुकाराम मुंढेंचा ऑपरेशन गुटखा’ यशस्वी! 350 जणांना अटक, 274 दुकाने सील, राज्यभर खळबळ

SCROLL FOR NEXT