Test Ranking : कसोटी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर; खराब कामगिरीचा भारताच्या फलंदाजाला फटका, टॉप १० मध्ये कोण?

latest ICC Test rankings top 10 batsmen list : कसोटीतील खराब कामगिरीचा भारताच्या भरवशाच्या फलंदाजाला मोठा फटका बसला. आयसीसीनं जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत त्याची घसरण झाली आहे. तर जो रुट आणि पाकिस्तानच्या बाबर आझमचंही मोठं नुकसान झालंय.
आयसीसीच्या ताज्या कसोटी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर
आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारतीय फलंदाज आणि कर्णधार शुभमन गिलला मोठा फटका बसला आहे. saam TV
Published On

Shubman Gill drops in ICC Test rankings after poor performance : भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील निकालाचा परिणाम ताज्या आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये दिसून आला आहे. भारताचा कर्णधार शुभमन गिलची बॅट जणू त्याच्यावर रुसली असून, धावाच निघत नसल्यानं त्याला मोठा फटका बसला आहे.

आयसीसीने नुकतीच कसोटी रँकिंग जाहीर केली आहे. यावेळी मोठी उलथापालथ झाल्याचं बघायला मिळालं. इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल यांना मोठं नुकसान सोसावं लागलंय. संघात कमबॅक केलेला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम टॉप १० मधून थेट बाहेर फेकला गेलाय. तर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला एका स्थानाचा फायदा झाला आहे.

भारत-श्रीलंका कसोटी मालिकेचा इफेक्ट

भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेचा इफेक्ट आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत दिसून आलाय. विशेष म्हणजे इंग्लंडचा हॅरी ब्रूक अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. त्याची रेटिंग सध्या ८५६ आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आता एक स्थान पुढे सरकला आहे. स्मिथ ८४० च्या रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. जो रूटला एका स्थानाचे नुकसान झाले आहे. तो ८२० च्या रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर घसरलाय. इंग्लंड आणि पाकिस्तानदरम्यान खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याला जास्त धावा करता आल्या नव्हत्या, त्याचा फटका त्याला बसला आहे.

गिल टॉप १० मधून बाहेर पडण्याची शक्यता

भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल अजून टॉप १० मधून बाहेर पडलेला नाही, पण त्याच्यासाठी धोक्याची घंटा दिसू लागली आहे. गिलला यावेळी दोन स्थानांचे नुकसान झाले. तो ७०९ च्या रेटिंगसह नवव्या क्रमांकावर फेकला गेलाय. भारताचा विकेटकीपर- फलंदाज ऋषभ पंत ७१३ च्या रेटिंगसह सातव्या क्रमांकावर कायम आहे. सर्वात मोठा फटका पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला बसला आहे. तो आता टॉप १० मधून बाहेर पडला आहे. थेट १५ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. त्याची रेटिंग घटून ६७९ झाली आहे. पाकिस्तानच्याच सौद शकीलने १५ स्थानांची झेप घेतली आहे. तो १८ व्या स्थानावर पोहोचला आहे.

डेरिल मिचेल टॉप १० मध्ये

ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड ८११ च्या रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा टेम्बा बावुमा पाचव्या आणि न्यूझीलंडचा रचिन रवींद्र सहाव्या स्थानावर आहे. न्यूझीलंडच्या डेरिल मिचेललाही एका स्थानाचा थोडा फायदा झाला आहे. तो आता आठव्या स्थानावर पोहोचला आहे.

आयसीसीच्या ताज्या कसोटी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर
India squad announced : टी २० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कुणाला पुन्हा संधी, कुणाचं कमबॅक?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com