Heart Attack Saam Tv
लाईफस्टाईल

Heart attack hidden causes: ९९ टक्के हार्ट अटॅकच्या केस, ४ अदृश्य कारणं; तुम्ही टाळाटाळ करूच नका, अन्यथा...

Heart attack risk factors: हृदयविकाराचा झटका हा आजार अचानक होतो असे अनेकांना वाटते. पण डॉक्टरांच्या मते, ९९ टक्के प्रकरणांमध्ये काही लपलेली कारणे आधीपासूनच शरीरात दिसू लागतात. ही कारणे दुर्लक्षित केल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो आणि जीवघेणा ठरू शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या हार्ट अटॅक आणि हृदयाच्या समस्यांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. आजकाल केवळ प्रौढ व्यक्ती नाही तर तरूणांमध्येही हार्ट अटॅकचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळतंय. भारतात जवळपास ९९ टक्के हार्ट अटॅक, स्ट्रोक तसंच हृदय निकामी होणं यांसारख्या घटना होण्यामागे एक किंवा अधिक गोष्टी कारणीभूत असतात.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे घटक धोकादायक असून ते वेळेत दिसून येत नाही. त्यामुळे या समस्येची छोटी छोटी लक्षणंही वेळेत ओळखणं गरजेचं असतं. याची लक्षणं काय दिसून येतात ते जाणून घेऊया.

हार्ट अटॅकची ४ अदृश्य कारणं

उच्च रक्तदाब

हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर आणि धमन्यांवर जास्त प्रमाणात दाब पडल्याने हृदयाच्या वॉलला धोका निर्माण होतो. यामध्ये प्लाक जमा होऊ लागतो. यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते.

हाय कोलेस्ट्रॉल

जास्त प्रमाणातील LDL, कमी HDL किंवा असामान्य लिपिड प्रोफाइल असलेल्या व्यक्तींच्या शरीरात योग्य पद्धतीने रक्ताभिसरण होत नाही. त्यामुळे गाठ तयार होण्याची शक्यता वाढते. अशावेळी हृदयाच्या स्नायूपर्यंत रक्त पोहोचत नाही.

वाढलेली ब्लड शुगर

ज्या व्यक्तींना मधुमेह आहे किंवा रक्तात साखरेची पातळी जास्त आहे त्यांच्या रक्तवाहिन्यावर परिणाम होतो. यामुळे हार्ट अटॅक येण्याचाही धोका वाढतो.

तंबाखूचं सेवन किंवा धुम्रपान

धुम्रपान टाळल्याने हार्ट अटॅकचा धोकाही टाळता येतो. अनेक लोकं त्याकडे दुर्लक्ष करतात. तर काही जणं जोपर्यंत गंभीर नुससा होत नाही तोपर्यंत लक्ष देत नाहीत.

हृदयविकाराचा झटका अचानक येऊ शकतो, पण त्याआधी दिसणाऱ्या संकेतांकडे लक्ष द्या

  • वारंवार थकवा जाणवणं

  • छातीत अस्वस्थता किंवा दडपण

  • हात, मान किंवा पाठीमध्ये होणाऱ्या वेदना

  • श्वास घेण्यास त्रास होणं

  • मळमळ किंवा जास्त घाम येणं

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai: वसईत भाजप-बविआ कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून लाठीचार्ज; VIDEO समोर

चंद्रपुरात काँग्रेस बाजी मारणार? विजय वड्डेटीवारांची खेळी यशस्वी ठरली

Municipal Elections Voting Live updates: उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक; पॅनल क्रमांक 18 मधील मत पेट्या घेऊन जाताना गोंधळ

Saam TV exit poll: परभणीत सर्वात ठाकरेसेना ठरणार मोठा पक्ष; सत्ता कोणाच्या हाती येणार?

Saam Tv Exit Poll: छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे बंधूंचा जोर कमी पडला? कुणाची सत्ता येणार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT