Healthy Heart Tips  Saam TV
लाईफस्टाईल

Healthy Heart Tips : वाढत्या वयानुसार हृदय निरोगी ठेवण्यासाठी 'या' तीन टिप्स नक्की फॉलो करा; कधीच येणार नाही हार्टअटॅक

Heart Tips : वाढत्या वयानुसार अनेक व्यक्तींना बीपी, शुगर आणि हर्टच्या सस्म्या आहेत. आपलं हृदय निरोगी असणे हे आपल्याच हातात आहे.

Ruchika Jadhav

वाढत्या वयानुसार प्रत्येक व्यक्तीला काही ना काही व्याधी जडतात. आरोग्याशी संबंधित अडचणी वाढतात. यामध्ये हृदयविकाराच्या समस्या सर्वाधिक असल्याचे दिसत आहे. वाढत्या वयानुसार अनेक व्यक्तींना बीपी, शुगर आणि हर्टच्या सस्म्या आहेत. आपलं हृदय निरोगी असणे हे आपल्याच हातात आहे. त्यामुळे आज याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

प्रोटीन आणि कॅल्शिअम असलेल्या पदार्थांचे सेवन

हृदय निरोगी राहावे यासाठी आपल्याला आहारावर नीट लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी डायेटमध्ये भाज्या, फळे, डाळिंबाचे दाणे, फायबर आणि व्हिटॅमिन आलेल्या पदार्थाचा समावेश करावा.

यामध्ये फळे आणि भाज्या महत्वाच्या आहे. कारण फळे आणि भाज्यांमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अँटी ऑक्सीडेंट्स असते. याने हृदयविकार कारणीभूत असलेला ऑक्सीडेटिव स्ट्रेस कमी होतो.

आहारात ब्राऊन राईस सुद्धा महत्त्वाचा आहे. ब्राऊन राईस खाल्ल्याने कॉलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो. त्यामुळे देखील आपले हृदय निरोगी राहण्यास मदत होते. तसेच आरोग्याशी संबंधित अन्य समस्या देखील दूर होतात.

मीठ आणि साखर कमी करा

पदार्थाची चव वाढवण्यासाठी मीठ आणि साखर दोन्ही महत्त्वाचे असतात. याने पदार्थाची चव वाढते. पदार्थ फार टेस्टी लागतात. मीठ आणि साखर दोन्हीही आपल्या आरोग्यासाठी तितकेसे चांगले नाही. काही व्यक्ती जेवताना पदार्थावर वरून मीठ टाकतात. आपल्या आरोग्यासाठी हे हानिकारक आहे. तर काही व्यक्ती खूप जास्त गोड आणि साखरेचे पदार्थ खातात. त्यामुळे लठ्ठपणा वाढतो, डायबेटिज वाढते आणि व्यक्तीच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो. हृदयाला देखील यामुळे धोका निर्माण होतो.

हेल्दी आणि अनहेल्दी फूड

प्रत्येक व्यक्तीला हेल्दी आणि अनहेल्दी फूडमधील फरक समजला पाहिजे. हा फरक ओळखता आला पाहिजे. एवॉकाडो, ऑलिव्ह ऑइल, मासे, ड्राय फ्रूट्स यामध्ये प्रोटीन असते. त्यामुळे हे आपल्या हार्टसाठी हेल्दी आहे. तर तळलेले पदार्थ,

प्रोसेस्ड फूड्स हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे आरोग्यावर मोठा परिणाम होतो. ज्या व्यक्ती जास्तीत जास्त तेलकट, गोड आणि खारट पदार्थ खातात त्यांना हृदयाच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो.

टीप : ही सामान्य माहिती आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तज्ज्ञांची मदत घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT