Heart Care Tips : देशात सगळीकडे थंडीचे दिवस सुरू असताना.उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये थंडीचा कहर वाढत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की,ब्रेन स्ट्रोक आणि हृदयविकाराच्या झटक्याची घटना रोज समोर येत आहे. डॉक्टरांचे असे म्हणे आहे की, थंडी मध्ये ब्रेन स्ट्रोक,हृदयविकाराचा झटका आणि दम्याचा त्रास अधिक असतो.
सततच्या घसरत्या तापमानामुळे कानपूरमध्ये हृदयविकार आणि ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली आहे. यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने बळी पडलेले १९ रुग्ण आहे.तर ब्रेन स्ट्रोकमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला. हृदयरोग संस्थेने जारी केलेल्या अहवालानुसार, थंडीमुळे गंभीर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
कानपूरच्या हृदयरोग संस्थेच्या कार्डिओलॉजी विभागाने डेटा जारी केला आहे. यामध्ये हृदयाशी संबंधित आजारांमुळे 23 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच, ब्रेन स्ट्रोकमुळे 2 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. म्हणहेजच कानपूरमध्ये शुक्रवारी थंडीच्या त्रासामुळे एकूण 25 जणांना जीव गमवावा लागला.
हिवाळ्यात अशी घ्या हृदयाची काळजी
हृदय आणि मेंदूशी सबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठी थंडीपासून संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे.
दिवसाला किमान सात ते आठ तासांची झोप घ्या
दिवसाला किमान ३० मिनिटे व्यायाम करा
डॉक्टरांचे असे सांगतात की,अत्यंत आवश्यक असले तरच घराबाहेर पडायचे आणि मॉर्निग वॉक बंद करण्याचा सल्ला ही त्यांनी दिला.
तसेच घरामध्येच योगासने आणि व्यायाम करा असे सांगतात.
त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या, पोष्टिक आहार घ्या.
हृदय किंवा छातीत दुखत असल्यास त्वरित डक्टरांचा सल्ला घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.