Healthy Heart Diet : हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आहारातील 'या' 4 पदार्थांपासून दूर रहा !

हल्ली हृदयाचे आरोग्य जपण्याचे प्रयत्न खूप कमी लोक करतात.
Healthy Heart  Diet
Healthy Heart Diet Saam Tv
Published On

Healthy Heart Diet : बदलेल्या जीवनशैलीनुसार अनेकांच्या आहारात बदल दिसून येत आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच जंक फूड आवडू लागले आहे. परंतु, हल्ली हृदयाचे आरोग्य जपण्याचे प्रयत्न खूप कमी लोक करतात.

मागच्या वर्षभरात आरोग्याच्या अनेक समस्या व हृदयविकाराचे प्रमाण आपल्या समोर आले. चुकीच्या जीवनशैलीमुळे आपण अनेक आजारांना बळी पडतो. जर तुम्हाला तुमच्या हृदयाचे आरोग्य सांभाळायचे असेल तर या 4 पदार्थांपासून दूर रहा

Healthy Heart  Diet
Symptoms Of Heart Block : थकवा येतोय, ही ५ लक्षणे दिसताहेत; वेळीच सावध व्हा, अन्यथा...

1. तळलेले पदार्थ

अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की सॅच्युरेटेड फॅट्स शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवण्याचे काम करतात. तळलेल्या पदार्थत किंवा प्रक्रिया केलेले पदार्थत मिठाचे आणि सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त असते. दोन्हीचा हृदयाच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. रेड मीट, फ्रेंच फ्राईज, सँडविच, बर्गर इत्यादी खाद्यपदार्थ LDL म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतात, ज्यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

2. लाल मांस

मांसाहारी लोकांमध्ये रेड मीट म्हणजेच लाल मांस खूप लोकप्रिय आहे. खरं तर ते संतृप्त चरबीने समृद्ध आहे, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक तयार होऊ शकते. जे मटण खाण्याचे शौकीन आहे, त्यांनी ज्या भागामध्ये जास्त प्रथिने आणि कमी फॅट असेल तो भाग खायला पाहिजे. तसेच, मासे हा सर्वात आरोग्यदायी आणि उत्तम पर्याय आहे.

Junk Food
Junk Food canva

3. सफेद तांदूळ,ब्रेड किंवा पास्ता

मैदा, साखर आणि प्रक्रिया केलेले तेल मिसळून व्हाईट ब्रेड तयार केला जातो, ज्याचा कोणताही फायदा होत नाही. पांढऱ्या पास्त्या बाबतही असेच आहे. दुसरीकडे, पांढऱ्या तांदळाबद्दल सांगायचे तर, त्यात फायबरचे प्रमाण कमी असते, त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी ते जास्त प्रमाणात सेवन करू नये. भात डाळ किंवा भाजीसोबत खाल्ल्यास त्यातील पोषणाचे प्रमाण चांगले होते, पण तरीही आहारात भाताचे प्रमाण अधिक नसावे.

4. सोडा किंवा केक

साखरेला एका कारणासाठी गोड विष म्हणतात. केक, मफिन्स, कुकीज आणि साखरयुक्त पेयांमुळे शरीरात जळजळ होते. साखरेच्या अतिसेवनाने शरीरातील चरबी वाढते, ज्यामुळे मधुमेह, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com