Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

Shocking News : घरी वाद झाल्यानंतर एका व्यक्तीचे पत्नी घर सोडून निघून गेली. त्यानंतर नवऱ्याने आई आणि दोन्ही मुलांसह विष प्राशन करुन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Shocking News
Shocking Newsx
Published On
Summary
  • एका व्यक्तीची पत्नी भांडणानंतर घर सोडून निघून गेली.

  • त्या व्यक्तीने त्याची दोन मुलं आणि वृद्ध आईसह आत्महत्या केली.

  • चौघांनीही विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Shocking Incident : एका व्यक्तीचे त्याच्या पत्नीसोबत भांडण झाले. भांडणानंतर त्याची पत्नी रागाच्या भरात घर सोडून निघून गेली. त्यानंतर दोन किशोरवयीन मुलं आणि वृद्ध आईसह त्या व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (२६ जुलै) रात्री मध्यप्रदेशमधील सागर जिल्ह्यातील खुराई पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तेहार गावात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर लोधी असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. मनोहरची पत्नी वाद झाल्यानंतर घर सोडून निघून गेली. यामुळे तो नाराज होता. दोघांमध्ये फोनवर पुन्हा वाद झाला. त्यानंतर मनोहरने त्याची ७० वर्षीय आई, १८ वर्षीय मुलगी शिवानी आणि १६ वर्षीय मुलगा अंकित यांच्यासह विष प्राशन केल्याची माहिती समोर आली आहे.

Shocking News
Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

हे कुटुंब सागर शहरापासून तब्बल १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतजमिनीवरील घरात राहत होते. मनोहरची आई आणि मुलगा अंकितचा विष प्राशन केल्याने जागीच मृत्यू झाला. शिवानी आणि मनोहर यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेव्हा ते दोघेही गंभीर अवस्थेत होते. उपचार सुरु असताना शिवानीचा मृत्यू झाला, तर रुग्णालयात नेताना मनोहरने प्राण सोडले.

Shocking News
Shocking : लग्न करण्यास नकार दिल्याने हत्या, प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरला विष देऊन संपवलं

मनोहरच्या घरात एक सुसाईड नोट सापडली. ही नोट शिवानी किंवा अंकित या दोघांपैकी एकाने लिहिली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुसाईड नोटमध्ये आत्महत्येला मनोहरची पत्नी कारणीभूत असून तिला मालमत्तेत कोणताही वाटा देऊ नये असे नमूद केले आहे. या नोटमध्ये कर्ज, पैश्यांचे व्यवहार अशा काही गोष्टींचा उल्लेख आहे.

Shocking News
Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com