Healthy Diet for kids Saam Tv
लाईफस्टाईल

Healthy Diet for kids: मुलांना निरोगी ठेवण्यासाठी 'या' ५ पदार्थांचा आहारात करा समावेश

मुलांना सकस आहार देणे हे एक आव्हान आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: Healthy Diet for kids : मुलांना सकस आहार देणे हे एक आव्हान आहे. मुलांचा आहार केवळ आरोग्यदायी नसून चविष्ट असावा, याचीही काळजी घ्यावी लागते. त्यांना एखादी डिश आवडत नसेल तर ते बघायलाही आवडत नाही. या परिस्थितीत, पालकांना त्यांच्या मुलांचा आहार निरोगी आणि चवदार बनवावा लागतो.

आजकाल अनेक पालक असे आहेत ज्यांना सकस आहार (Food) देण्याबाबत अजुनही माहिती नाही. ते त्यांना काहीही खायला देतात. ज्यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपण मुलांच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा, यात कोणते पदार्थ आहेत ते आपण पुढे जाणून घेऊया. (Healthy Diet for kids)

मुलांना धान्य खायला द्या

धान्यांमध्ये भरपूर फायबर असते. धान्यातून अनेक आवश्यक पोषक घटक मुलांच्या शरीरात जातात. मुलांच्या आहारात गहू आणि तपकिरी तांदूळ यांचा समावेश करा. जेणेकरून हा आहार आरोग्यदायी आहार बनू शकेल.

मुल धान्ये खायला लागल्यापासून त्यांच्या आहारात फायबर आणि पोषक तत्वांनी युक्त भाज्यांचा समावेश करणे सुरू करा. पालक, बीन्स, ब्रोकोली आणि गाजर यांसारख्या भाज्या मुलांना खायला द्या. (Healthy Diet for kids)

फळ निरोगी ठेवतात

फळांमध्ये अनेक पोषक घटक असतात. मुलांच्या आहारात दररोज किमान एका फळाचा समावेश करा. फळांमध्ये, त्यांना केळी, टरबूज आणि सफरचंद खायला द्या. त्यामुळे मुलांचा आहार निरोगी राहील.

कडधान्य आणि शेंगा खायला द्या

कडधान्ये आणि शेंगा लोह, पोटॅशियम आणि फायबरचा चांगला स्रोत आहेत. हे मुलांच्या आहारात समाविष्ट केले जाऊ शकते. चणे, राजमा, वाटाणे, चणे मुलांसाठी फायदेशीर ठरू शकतात.

सुका मेवा ठरतो फायदेशीर

१२ महिन्यांच्या बाळांना आहार हेल्दी बनवण्यासाठी त्यांना संपूर्ण गोष्टींची प्युरी दिली जाऊ शकते. यात सुक्या मेव्यांचा समावेश आहे. ते चांगले शिजवून मुलांच्या आहारात (Food) समाविष्ट केले जाऊ शकतात. खजूर आणि अंजीर मुलांना सर्वात जास्त फायदेशीर ठरतात.

मुलांचा आहार निरोगी बनवण्यासाठी या ५ प्रकारच्या आहाराचा समावेश केल्यास मुल निरोगी राहतात. (Healthy Diet for kids)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस, भिडे पूल पाण्याखाली

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT