नाशिक - तुम्ही दररोज जीममध्ये व्यायामासाठी ट्रेडमिलचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण जिममध्ये नुकतेच जिममध्ये ट्रेडमिलवर (Treadmill) व्यायाम करत असताना राजू श्रीवास्तवला अटॅक आल्याचं समोर आलं आहे. याजीमआधीही अशा घटना समोर आल्या असून त्यामुळे जीम मध्ये जाणाऱ्यांनी अधिक खबरदारी घेणं गरजेचं आहे.
सध्या फिट राहण्यासाठी अनेक जण दररोज जीममध्ये वर्क आऊट करतात. मात्र जीममध्ये वर्क आऊटचा वेळ नाही तर तुम्ही कसा व्यायाम करता, हे महत्वाचे असते. हे अनेकांना माहीत नसते. अनेकदा जीममध्ये दुसऱ्यांसोबत स्पर्धा करण्यासाठी शारीरिक क्षमता नसतांनाही अतिरिक्त अथवा शरीराला न झेपणार वर्क आऊट केलं जातं. मात्र त्याच नुकसान स्वतःला भोगावे लागतात, याचा अंदाज अनेकांना येत नाही.
हे देखील पाहा -
58 वर्षीय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना जीममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा धक्का आला. त्यांना 10 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रेडमिलवर धावत असताना त्यांच्या छातीत कळ आली व ते खाली कोसळले. आता त्यांची अँजिओप्लास्टी झाली आहे. त्यांच्या हृदयाच्या एका मोठ्या भागात 100% ब्लॉकेज आढळलेत. ते सध्या ICU मध्ये आहेत. मात्र जिम मध्ये वर्क आऊट करतांना याआधी अनेकदा हार्ट अटॅक येण्याच्या घटना घडल्यात. त्यामुळे वर्क आऊट करतांना अधिक काळजी आणि खबरदारी घ्यायला हवी.
ट्रेड मिल वापरताना काय काळजी घेतली पाहिजे
- तुम्ही तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार व्यायाम केला पाहिजे.
- दुसऱ्यांकडे पाहून एक्सायटेड होऊ नका. हळूहळू आपल्या क्षमता वाढवा.
- श्वासोश्वास वाढणार नाही किंवा धाप लागणार नाही, एवढाच व्यायाम करा.
- मसल्स बनवण्यासाठी तासंतास घाम गाळून नका.
- संतुलित आहार घ्या. तेल-तूप कमी खा.
- केवळ जिमकडून देण्यात येणाऱ्या प्रोटीन अथवा अन्य गोष्टींचे सेवन करू नका
- झटकन वजन कमी करण्याच्या भानगडीत पडू नका.
- शरीर हायड्रेट ठेवा. किमान 3-4 लीटर दररोज पाणी प्या
सद्यस्थितीत अनेकांवर कामाचा दबाव खूप असतो. त्याचा थेट प्रभाव त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर पडतो. खूप जास्त स्ट्रेस घेतल्यामुळे त्याचा थेट संबंध हृदयाशी येतो. सातत्याने ताण घेणाऱ्या लोकांना हार्ट अटॅक येण्याची भिती असते. तर अनेकदा तरुणही टीव्ही आणि मोबाइलवर सेलिब्रिटीजना पाहून मसल्स तयार करण्यासाठी जीममध्ये तासंतास व्यायाम करतात. अनेक प्रकारची औषधीही घेतात.
त्यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो. त्यामुळे मसल्स लवकर बनवण्यासाठी स्टेरॉयडचा वापर टाळा. डायटिशियनच्या सल्लानुसार डायट घ्या. घाईच्या चक्करमध्ये एक्स्ट्रा सोर्स किंवा औषधी बिल्कुल घेऊ नका. हळू-हळू व्यायाम करण्याची क्षमता वाढवा. एकदम हेवी वर्कआउट केल्याने त्याचे शरीरावर वाईट परिणाम पडू शकतात.
त्याऐवजी दररोज किमान 45 मिनिटे व्यायाम करावा. सर्वाच चांगला व्यायाम पायी चालण्याचा आहे. पायी चालताना धाप लागणार नाही एवढा वेग ठेवा. असा सल्ला तज्ञ देतात. त्यामुळे जीम मध्ये वर्क आऊट करण्यासाठी एकदा तज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यानुसारच डाएट आणि वर्क आऊट करण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.