Laal singh chaddha : आमिर खानविरोधात तक्रार; काय-काय आहेत आरोप?

बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही.
Laal Singh chaddha
Laal Singh chaddha Saam Tv

Laal singh chaddha Update |मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा(Aamir Khan) 'लाल सिंग चड्ढा'(Laal singh chaddha) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या चित्रपटावर आता धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे बॉलिवूड अभिनेता आमिर खानविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Laal Singh chaddha
Ranveer Singh: ‘न्यूड फोटोशूट’ प्रकरणी रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांकडून समन्स

मीडिया रिपोर्टरनुसार, आमिर खानविरोधात शुक्रवारी म्हणजेच काल तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिल्लीतील वकील विनीत जिंदाल यांनी आमिर खानविरोधात तक्रार दाखल केली असून, भारतीय लष्कराचा अपमान आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.

आमिर खानविरोधात कलम १५३, १५३ए, २९८ आणि ५०५ अंतर्गत खटला दाखल केला आहे. आमिर खानसोबतच वकील विनीत जिंदाल यांनी 'लाल सिंग चड्ढा' आणि पॅरामाउंट पिक्चर्स प्रोडक्शन हाऊसचे संचालक अद्वैत चंदन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आपल्या तक्रारीत त्यांनी लिहिले आहे की, चित्रपटातील बराच मजकूर आक्षेपार्ह आहे. त्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

Laal Singh chaddha
Salman Khan: सलमान खानने शिकार केलेल्या 'त्या' काळवीटाचे स्मारक उभारले जाणार

तक्रारीत असेही लिहिले आहे की, 'वादग्रस्त चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाची कथा त्याआधारे बनवली आहे, ज्यामध्ये एका मनोरुग्ण व्यक्तीला कारगिल युद्ध लढण्यासाठी सैन्यात भरती केल्याचे दाखवण्यात आले आहे. कारगिलसाठी देशातील सर्वात आश्वासक सैनिक पाठवण्यात आले होते, याची सर्वांना जाणीव आहे. पण चित्रपटात जे चित्रण करण्यात आले आहे, ते पाहता निर्मात्यांनी भारतीय लष्कराची बदनामी करणारा कंटेंट मुद्दाम दाखवला असल्याचे स्पष्ट होते'.

त्याचवेळी, चित्रपटाचा एक भाग आक्षेपार्ह ठरवत वकिलांनी दावा केला आहे की, चित्रपटाच्या एका दृश्यात एक पाकिस्तानी सैनिक लाल सिंग चड्डाला म्हणतो की, 'मी नमाज अदा करतो आणि नमाज पढतो, तुम्ही असे का करत नाही? ज्याला लाल सिंह चड्ढाच्या भूमिकेत आमिर खान उत्तर देतो की 'माझी आई म्हणते की ही पूजा मलेरिया आहे, त्यामुळे दंगल होते.'

तक्रारदार वकिलांचे असेही म्हणणे आहे की, आमिर खान हा प्रसिद्ध अभिनेता आहे, त्यामुळे त्याच्या बोलण्याचा मोठा प्रभाव पडू शकतो. हिंदू समाजासाठी अभिनेत्याचे हे विधान देशाची सुरक्षा, शांतता बिघडवण्याचे काम करू शकते'. ११ ऑगस्ट रोजी आमिर खानचा चित्रपट 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आता चित्रपटासोबतच अभिनेत्यांविरुद्धचा लोकांचा हा विरोध किती दिवस सुरू राहतो, हे पाहावे लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com