Blood Pressure Saam Tv
लाईफस्टाईल

Blood Pressure कंट्रोल राहाण्यासाठी काय कराल? Diet मध्ये या पदार्थांचा समावेश कराच

कोमल दामुद्रे

Blood Pressure Diet :

खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकांना आजारांने ग्रासले आहे. सध्या मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या समस्यने अनेक तरुण त्रस्त आहे. आरोग्यासाठी लो आणि हाय बीपी दोन्ही घातक आहे.

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी बरेच लोक विविध औषधांचं सेवन करतात परंतु, योग्य आहार घेतल्यास रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. ज्यांचा रक्तदाब नेहमी अनियंत्रित राहातो. त्यांनी ही बातमी जरूर वाचावी तसेच डाएटमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा हे जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. फायबर

हिवाळ्यात (Winter) हाय बीपीचा त्रास बरेचदा उद्भवतो. यासाठी आहारात धान्य, फळे आणि भाज्या यांसारख्या फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे तुमचे पचन सुधारण्यास मदत होईल. तसेच हृदयविकाराचा (Heart Attack) धोकाही कमी होईल.

2. सोडियम

आहारात अधिक प्रमाणात सोडियमचे प्रमाण झाल्यास रक्तदाब वाढतो. प्रक्रिया केलेले पदार्थ, फास्ट फूड आणि मीठ असणाऱ्या पदार्थांचे सेवन शक्यतो टाळा. मीठाचे सेवन करताना त्यांना प्रमाण देखील माहीत असायला हवे.

3. हर्बल उपाय

अश्वगंधा, ब्राह्मी आणि अर्जुन यांसारख्या औषधी वनस्पतीचा रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी खूप फायदा (Benefits) होतो. तसेच ताण कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

4. दही

दह्यामध्ये प्रोबोयोटिक्स आढळतात. रोज दही खाल्ल्याने सर्व प्रकारचे आजार दूर होतात. उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी दह्याचे सेवन अधिक फायदेशीर समजले जाते.

5. बीट

ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो त्यांनी नियमितपणे बीटरुटचा ज्यूस प्यावा. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी बीट उपयुक्त आहे. जर तुमचा रक्तदाब कमी झाला असेल तर अशावेळी चहा किंवा कॉफीचे सेवन करु शकता.

6. हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी आहारात पालक, कोबी, बडीशेप आणि कोशिंबीरचा समावेश करायला हवा. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT