Women Diet After 40 : महिलांनो, वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर या ४ पदार्थांचे सेवन कराच, राहाल अनेक आजारांपासून दूर

Superfood After 40 age : वयाची चाळीशी ओलाडल्यानंतर महिलांमध्ये शरीरात बरेच हार्मोनल बदल होऊ लागतात. ज्याचा त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागतो. चेहऱ्यावर वाढत्या वयाचे लक्षण दिसू लागते.
Women Diet After 40
Women Diet After 40Saam Tv
Published On

Women Health Tips :

वाढत्या वयानुसार महिलांनी आपल्या आहारात आणि जीवनशैलीत बदल करायला हवी. विशेषत: महिलांनी त्यांच्या आहाराकडे अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.

वयाची चाळीशी ओलाडल्यानंतर महिलांमध्ये शरीरात बरेच हार्मोनल बदल होऊ लागतात. ज्याचा त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागतो. चेहऱ्यावर वाढत्या वयाचे लक्षण दिसू लागते. शरीर हळूहळू कमजोर होऊ लागते. जर तुम्हाला दीर्घकाळ तरुण राहायचे असेल आणि वृद्धत्व रोखायचे असेल तर या ४ पदार्थांचा आहारात नक्की समावेश करा. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. आवळा

आवळा महिलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. आवळा आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरला जातो. आवळा खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. आवळा शरीरातील दोष नियंत्रित करतो. याच्या मदतीने बद्धकोष्ठता, गॅस, ऍसिडिटी आणि हाडांशी संबंधित आजार (Disease) बरे होतात. आवळा खाल्ल्याने त्वचा, केस आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. आवळा वृद्धत्व कमी करण्यास फायदेशीर ठरते.

Women Diet After 40
Yoga For Women : महिलांनो, वयाची तिशी ओलांडल्यानंतर फिट राहायचे आहे? ही ४ योगासने नियमित कराच!

2. अशोका

अशोका हे आयुर्वेदिक झाड आहे. शरीरासाठी हे अतिशय आरोग्यदायी (Health) मानले जाते. महिलांच्या आरोग्यासाठी अशोका खूप फायदेशीर आहे. वयाची चाळीशी ओलाडंल्यानंतर मासिक पाळी सुरळीत होते. तसेच यामुळे रजोनिवृत्तीच्या काळात होणाऱ्या समस्याही कमी होऊ शकतात.

3. शतावरी

महिलांसाठी शतावरी ही जादूई औषधी वनस्पती आहे. शतावरी महिलांच्या हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करते. त्यामुळे मन आणि शरीराला आराम मिळतो. यामुळे मासिक पाळी, जननक्षमता आणि रजोनिवृत्ती दरम्यान शतावरी खूप फायदेशीर (Benefits) आहे.

Women Diet After 40
Weight Loss Tips : हिवाळ्यात वजन कमी करायचे आहे? रोज प्या हे डिटॉक्स ड्रिंक, आठवड्याभरात दिसाल स्लिम-ट्रीम

4. मोरिंगा

सूपरफूड मोरिंगा वरदानापेक्षा कमी नाही. मोरिंगा हे महिलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. मोरिंगामध्ये लोह, कॅल्शियम आणि भरपूर खनिजे आढळतात. यामध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटक वृद्धत्व कमी करण्यास मदत करतात. तसेच वजन नियंत्रणात राहाण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com