Gadgets Harming Our Brain : धक्कादायक! मोबाइल-गॅजेट्सचा मेंदूवर होतोय परिणाम, कारण काय? संशोधनातून सिद्ध

Mobile Phone Harming Our Brain : सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेकांना फोन वापरण्याची सवय असते. परंतु, याचा वाढता स्क्रीन टाइम आरोग्यासाठी अधिक धोकादायक आहे. फोनच्या अतिवापरामुळे मेंदू आणि मनावर देखील परिणाम होतो. याचा आरोग्यावर कसा दुष्परिणाम होतो जाणून घेऊया.
Gadgets Harming Our Brain
Gadgets Harming Our BrainSaam Tv
Published On

Side Effects Of Using Mobile Phone :

वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगामुळे सध्या मोबाइल आणि गॅजेट्सचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. मोबाइल फोन हा प्रत्येकाच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे.

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेकांना फोन वापरण्याची सवय असते. परंतु, याचा वाढता स्क्रीन टाइम आरोग्यासाठी अधिक धोकादायक आहे. फोनच्या अतिवापरामुळे मेंदू आणि मनावर देखील परिणाम होतो. याचा आरोग्यावर कसा दुष्परिणाम होतो जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. मेंदूवर गॅजेट्सचा परिणाम

तज्ज्ञांनी सांगितले की, गॅजेट्सवरील वाढता प्रभाव हा माणसांच्या मेंदूवर परिणाम करतो. ज्यामुळे चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या गॅजेट्समुळे आपले जीवन सोपे झाले असले तरी, मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे. यामुळे अनेकांमध्ये एकाग्रतेचा अभाव, नैराश्य आणि ताणतणाव (Stress) दिसून येत आहे. सोशल मीडियावर मिळणाऱ्या लाइक्सच्या आहारी लोक जाताना दिसत आहे. तसेच मुलांमध्ये मोबाइल (Mobile) गेम्सची क्रेझ ही दिसून येत आहे.

2. संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर

मिळालेल्या माहितीनुसार मोबाइलच्या अतिवापरामुळे क्षमतेवर विपरीत परिणाम होत आहे. आपला मेंदू एकाच वेळी अनेक ठिकाणी कार्य करत असतो. यामुळे सर्व माहिती पटकन लक्षात ठेवण्यास त्रास होतो. त्यामुळे मल्टीटास्किंगमुळे आपण एकाच वेळी अनेक साइट्स आणि अॅप्सवर काम करत असतो. यामुळे एकाग्रतेचा अभाव, लक्ष केंद्रित करण्यात अडचण, कामावर खराब कामगिरी आणि लक्षात ठेवण्यास अडचण येण्यासारखे परिणाम दिसून येत आहेत.

Gadgets Harming Our Brain
Brain Health : रोजच्या या सवयींमुळे मेंदूवर होतो परिणाम, ताण कमी करण्यासाठी या गोष्टी करुन पाहाच

3. शारीरिक आणि मानसिक समस्यावर परिणाम

फोनच्या अतिवापरामुळे मेंदूसह आरोग्यावर देखील परिणाम होतो आहे. यामुळे तणाव आणि डोकेदुखी (Headache), मान आणि पाठदुखी, कार्पल टनल सिंड्रोम आणि नैराश्य या समस्यांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते आहे. तसेच याच्या अतिवापरामुळे सोशल डिस्टन्सिंगही वाढत आहे. आपण घरात असल्यावरही कुटुंबाला वेळ देण्याऐवजी मोबाइलमध्ये व्यस्त असतो. एकमेकांसोबत वेळ घालवण्याऐवजी फोनवर जास्त वेळ घालवतो. ज्याचा मेंदूवर अतिशय वाईट परिणाम होतो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com