Health Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Health Tips : दिवसभर Energetic राहायचे आहे? तर सकाळपासूनच करा ही काम, कधीही भासणार नाही थकवा

Shraddha Thik

Health Tips For Energy :

आपण सकाळची सुरुवात ज्या पद्धतीने करतो, त्याच पद्धतीने आपला संपूर्ण दिवस जातो, असे अनेकदा म्हटले जाते. सकाळी उठल्यानंतर काही चांगल्या सवयी लावून घेतल्याने तुमचा मूड दिवसभर फ्रेश राहतो आणि तुम्हाला सक्रियही वाटते. चांगले जीवन जगण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत (Lifestyle) काही बदल करणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्ही दिवसभर तणावमुक्त राहू शकाल.

अनेक वेळा, जेव्हा आपल्याला पुरेशी झोप (Sleep) मिळत नाही, तेव्हा आपल्याला दिवसभर चिडचिड होत असते, ज्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस खराब होतो. जर तुम्ही दररोज अशा प्रकारच्या समस्येतून जात असाल तर तुम्हाला तुमची जीवनशैली बदलण्याची नितांत गरज आहे. जीवनशैलीतील बदलामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल. उत्साही वाटण्यासाठी, तुम्ही आतून तंदुरुस्त राहणे महत्त्वाचे आहे, यासाठी तुम्ही तुमच्या दिनचर्येत काही बदल करू शकता.

आरोग्यदायी आणि पौष्टिक नाश्ता

सकाळचा नाश्ता हा दिवसभरातील सर्वात महत्त्वाचा आहार मानला जातो. बरेच लोक उशिरा उठतात, त्यामुळे ते नाश्ता सोडून थेट दुपारचे जेवण करतात. नाश्ता वगळणे ही सर्वात मोठी चूक आहे. सकाळची सुरुवात नेहमी हेल्दी ब्रेकफास्टने करा. त्याचे फायदे तुम्हाला नक्कीच मिळतील. रोज सकाळी एकाच वेळी नाश्ता केल्याने तुमच्या शरीरात कधीही ऊर्जेची कमतरता भासणार नाही. दिवसभर एनर्जी लेव्हल राखण्यासाठी नाश्ता केल्याशिवाय घराबाहेर पडू नका.

सकाळी लवकर उठण्याची सवय लावा

जे लोक उशिरा उठतात ते अनेक महत्त्वाच्या गोष्टींना मुकतात. खरं तर, जे लोक सकाळी ऑफिसला जातात ते रात्री उशिरा झोपतात, त्यामुळे त्यांना पुरेशी झोप मिळत नाही आणि दिवसभर थकवा जाणवतो. त्यामुळे निरोगी जीवन जगण्यासाठी तुम्ही तुमची झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करणे महत्त्वाचे आहे. सकाळी लवकर उठल्याने तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर करू शकाल आणि दिवसभर ताजेतवाने अनुभवाल.

ध्यान आणि व्यायाम करा

निरोगी जीवनशैलीसाठी, आपण आपल्या दैनंदिन दिनचर्यामध्ये ध्यान आणि व्यायाम समाविष्ट करणे सर्वात महत्वाचे आहे. रात्री झोपण्यापूर्वी ध्यान करावे. यामुळे तुमचे मन शांत होईल आणि तुम्हाला चांगली झोपही लागेल. सकाळी फ्रेश झाल्यानंतर किमान १५-२० मिनिटे व्यायाम करा. ध्यान आणि व्यायाम केल्याने तुमचे मन आणि शरीर दोन्ही सक्रिय राहतील. यामुळे तुमच्या आयुष्यातील तणावही कमी होईल.

तंत्रज्ञानापासून अंतर ठेवा

आजकाल लोकांचे जीवन मोबाईलशिवाय अपूर्ण आहे. आपल्यापैकी बरेच जण सकाळी सर्वात पहिले फोन उचलतात. त्याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर होतो. सकाळी उठल्यानंतर किमान 1 तास कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर न करण्याचा प्रयत्न करा. सकाळी मोबाईल वापरण्याची सवय तुमचा मेंदू मंद करू शकते.

ध्येय निश्चित करा

सकाळी उठल्यानंतर आणि फ्रेश झाल्यानंतर, आज तुम्हाला कोणते काम पूर्ण करायचे आहे याचा आराखडा तयार करा आणि दररोज स्वतःसाठी एक ध्येय निश्चित करा. ध्येय निश्चित केल्याने, तुम्ही दिवसभर तुमचे ध्येय पूर्ण करण्यात गुंतून राहाल, ज्यामुळे तुमचा वेळ कमीत कमी वाया जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहिण' ठरणार गेमचेंजर? मतांनी महायुतीची झोळी भरणार?

Assembly Election: पिपाणीने वाढवलं तुतारीचं टेंशन; निवडणूक आयोगाने शरद पवार गटाची पिपाणी हटवण्याची मागणी फेटाळली

Pune News: कोजागिरी पौर्णिमेला पुण्यातील उद्यानांच्या वेळेत वाढ, रात्री १२ वाजेपर्यंत राहणार उघडी

Priyanka Gandhi Vadra : अखेर काँग्रेसने डाव टाकला; प्रियंका गांधींची राजकारणात एन्ट्री, उमेदवारी जाहीर,VIDEO

Maharashtra News Live Updates: 225 बोपदेव घाट सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी अपडेट; आरोपीकडून दांडके आणि कपडे जप्त

SCROLL FOR NEXT